vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अत्याचारग्रस्तांच्या वारसांनी नोकरीसाठी 10 डिसेंबर  पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अत्याचारग्रस्तांच्या वारसांनी नोकरीसाठी 10 डिसेंबर  पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  मुंबई, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या २० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ (सुधारीत अधिनियम, २०१५) अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचारामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील अशा प्रकरणांतील पात्र वारसांनी १० डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावे,असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.      अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर,नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना 100 टक्के उद्दिष्टपूर्ती*

करियर निवडीसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

मिरजच्या शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश प्रक्रीया सुरु

vishwatmaklokswamivarta

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता MH24- CF ही नवीन मालिका सुरु होणार

राज्यभरात १० हजारांहून अधिक उमेदवारांना मिळणारआज नियुक्तीपत्रे; जिल्ह्यातील २९६ जणांचा समावेश