vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कायदेशीर जनजागृतीबाबत सातारा शहरात शालेय मुलांची रॅली

कायदेशीर जनजागृतीबाबत सातारा शहरात शालेय मुलांची रॅली

 सातारा प्रतिनिधी बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद, स्त्रीभ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक कुप्रथा अशा वाईट गोष्टीचे दुष्परिणाम आणि त्यांचे उच्चाटन करण्याचे मार्ग या संदर्भास अनुसरून सातारा शहरामध्ये कायदेशीर जनजागृतीबाबत शालेय मुलांच्या रॅली” आयोजित करण्यात आली होती.

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचेमार्फत बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद, स्त्रीभ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक कू-प्रथांचे दुष्परिणाम आणि त्यांचे उच्चाटन करण्याचे मार्ग या संदर्भास अनुसरून सातारा शहरामध्ये कायदेशीर जनजागृतीबाबत शालेय मुलांच्या रॅलीचे आयोजन दिनांक १८ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सातारा शहरामधून करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद, स्त्री-भ्रूणहत्या या कृप्रथांचे निर्मूलन करण्यासाठी आण्णासाहेब कल्याणी विदयालय, सातारा येथील विदयार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच महाराजा सयाजीराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, सातारा येथील विदयार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, अरविंद शं. वाघमारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, श्रीमती. निना. नि. बेदरकर, सर्व न्यायिक अधिकारी, महिला व बालविकास कार्यालय, सातारा येथील अधिकारी व शिवाजी मलदोडे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सातारा, आण्णासाहेब कल्याणी विदयालय, सातारा येथील मुख्याध्यापक, शिक्षक व विदयार्थी, महाराजा सयाजीराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, सातारा, येथील मुख्याध्यापक, शिक्षक व विदयार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते. सदर रॅली जिल्हा न्यायालय, सातारा येथून आर. टी. ओ. रोड सिव्हिल हॉस्पीटल पोवईनाका यामार्गे काढणेत आली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद तसेच स्त्री-भ्रूण हत्या विषयीच्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांना रॅलीदरम्यान अल्पोपहाराची व्यवस्था विधी सेवा प्राधिकरण, सातारा या कार्यालयामार्फत करण्यात आली होती. रॅली सोबत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.वाहतुक शाखेमार्फत वाहतुकीचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. तसेच जिल्हा रुग्णालयातर्फे रुग्णवाहिका व वैद्यकीय अधिकारी यांचाही समावेश होता.

संबंधित पोस्ट

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण: अमृत आणि एमसीईडीचा संयुक्त उपक्रम

vishwatmaklokswamivarta

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन