vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

अमृत’ संस्थेतर्फे मोबाइल फिल्म-मेकिंगचा प्रशिक्षण वर्ग सुरु

‘अमृत’ संस्थेतर्फे मोबाइल फिल्म-मेकिंगचा प्रशिक्षण वर्ग सुरु

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्था ‘अमृत’च्या वतीने मोबाइल फिल्म-मेकिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरु झाला असून शनिवारी (दि.२०) हा वर्ग सुरु झाला

 मोबाईलद्वारे चित्रीकरण करुन काम करता यावे आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात मोबाईल वापरून चित्रीकरण करणे, प्रकाश योजना, चित्रचौकट, ध्वनी याबाबत मूलभूत माहिती, संकलन,कथा निवेदन, पटकथा लेखन, तसेच सोशल मीडियासाठी रील्स आणि शॉर्ट फिल्म्स तयार करणे याबाबत सविस्तर आणि प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जात आहे

या प्रशिक्षणासाठी नहुष बडगे आणि आश्लेष जामरे हे अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देत आहेत.

कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत मित्र रामेश्वर साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. पत्ता:- विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर .पि को :४३१००९ संपर्क क्रमांक अक्षय लंबे-७३९१०६५४७५.

०००००

संबंधित पोस्ट

पु. ल. कट्ट्यावर ७ ऑगस्टला विजयाबाईंच्या आठवणींचा जागर

vishwatmaklokswamivarta

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला -महाकुंभमध्ये गंगा आरती करून कतरिना कैफ सासू वीणा कौशलसोबत घरी परतली.

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी झाली नतमस्तक…

उदयपूर फाइल्स- सत्य घटनेवर  कन्हैयालाल दर्जी हत्याकांडावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ११ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होणार

vishwatmaklokswamivarta

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृतीसाठी अंतिम मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत वाढवली

vishwatmaklokswamivarta