vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली-कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली-कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

     ठाणे, प्रतिनिधी:- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीने यावेळी व्यक्त केली.

  याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के-पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी मनोज सयाजीराव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, उमेश पाटील, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करण्यात येवून त्यांना हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.

     यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

 

CMOMaharashtra Maharashtra DGIPR Collector Thane Ddikonkan Konkanbhavan

संबंधित पोस्ट

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…

आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिलापूर येथील ‘सीपीआरआय’च्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

ध्वनीची विहित मर्यादा राखून विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta