vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा (National fertilizer sale framework) प्रकल्पांतर्गत IFMS व Agristack प्रणालीचे संयुक्तीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे क्यू आर कोड द्वारे खत खरेदी करता येणार आहे. या खत वितरण प्रणालीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी राज्यात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे,असे कृषी संचालक पुणे यांनी कळविले आहे.

 यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, केंद्र शासनाने Fertilzer sale application system ( FSAS) हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे QR code द्वारे शेतकऱ्यांना खतांचे बुकींग करता येणार आहे. शेतकऱ्यांनी QR code द्वारे खत बुक केल्या नंतर QR code तीन दिवस वैध राहणार असून शेतकरी त्यांच्या सोयीनुसार त्यांनी निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतात. यामुळे खताचे online booking केल्याने रांगेत उभे राहावे लागणार नाही. आवश्यक खताचे booking केल्यामुळे इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती दुकानदाराकडून होणार नाही. त्यामुळे खत विक्री मध्ये सुलभता व पारदर्शकता येईल.

 सद्यस्थितीत दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे किंवा नाही हे समजत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचे दिसून येते,वरील प्रणालीमुळे या गोष्टी टाळता येणार आहेत.

 या वितरण प्रणालीची केंद्र शासनाच्या टीम ने पुणे जिल्ह्यातील अष्टापुर ता हवेली येथे यशस्वीपणे चाचणी घेतली आहे. राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची केंद्र शासनाने निवड केली असून पथदर्शी प्रकल्प म्हणून खरीप हंगामात Fertilizer sale application system या प्रणालीद्वारे खत विक्रीची सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

०००००

संबंधित पोस्ट

रसच्या रंगतदार दुनियेत हरवलेलं मन; खरेदीसोबत प्रेरणेचीही मेजवानी!”वाशीच्या CIDCO Exhibition Centre मध्ये भरलेला ‘महालक्ष्मी सरस’ सोहळा…

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

पालकमंत्री शिरसाट यांची पैठण शहरातील पूरग्रस्त भागास भेट..

vishwatmaklokswamivarta

बंजारा समाजाच्या बोलीभाषेचा समावेश 8 व्या अनुसूचीमध्ये करावा- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

जागृती योजनेंतर्गत मिरजेत 11 जुलैला कायदेविषयक शिबीर

नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप