vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत;३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत…

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत;३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.२१, २२ व २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी दि.३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीचा उद्देश सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारीत निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. त्यासाठी पक्षकार, वकील ह्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://forms.gle/iqxefqF4BCWzukoP6 या गुगल लिंकवर अर्ज भरता येणार आहे. तसेच https://www.sci.gov.in या संकेतस्थळावरुनही अर्ज भरता येणार आहे. या लोकअदालतीत पक्षकारांना आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. दि.३१ मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या विशेष लोकअदालतीत सहभाग घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश

बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- गेल्या दोन महिन्यात महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2055 वाहनधारकांना ई चालान जारी

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू· वाढवण बंदराभोवती नवीन शहर टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट· महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच..

vishwatmaklokswamivarta

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील