vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नाशिक महानगरपालिकेतील सहा नगरसेवक वर पोलिसांनी गुन्हे दाखल

नाशिक महानगरपालिकेतील सहा नगरसेवक वर पोलिसांनी गुन्हे दाखल

नाशिक प्रतिनिधी  : महापालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण सोहळ्याचा धडाका सुरू आहे. सध्या लॉकडाऊन  शिथील केले असले, तरी मनाई आदेश कायम आहे. तरीही लोकप्रतिनिधींकडून त्याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. यामुळे तब्बल सहा नगरसेवकांवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सहा नगरसेवकांवर गुन्हे दाखलकोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी आणि उपस्थितीवर मर्यादा आल्या आहेत. तरीही लोकप्रतिनिधींकडून त्याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. कोरोना महामारीच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश कायम असताना, विनापरवानगी विकासकामांचे उद्‌घाटन करून गर्दी जमविल्याप्रकरणी सहा नगरसेवकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात तीन नगरसेविकांचा समावेश असून, पश्चिम विधानसभा मतदारसंघातील हे नगरसेवक आहेत. दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, प्रतिभा पाटील, भागवत आरोटे, मधुकर जाधव अशी गुन्हे दाखल झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण सोहळ्याचा धडाका सुरू आहे. सध्या लॉकडाऊन शिथील केले असले, तरी मनाई आदेश कायम आहे. त्यामुळे औद्योगीक वसाहतीतील प्रभाग २६ मधील वडारवाडी भागातील हॉटेल पंचरत्न मागे शनिवारी (ता. २५) शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखांच्या हस्ते रस्ता कॉंक्रिटीकरणाचे उद्‌घाटन झाले.

गर्दी जमविल्याचा आरोपप्रभाग २८ मधील महालक्ष्मीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज समाजमंदिराजवळील पाण्याच्या टाकीचा रविवारी (ता. २६) लोकार्पण झाले. या दोन्ही कार्यक्रमांसाठी संबंधित नगरसेवकांनी गर्दी जमविल्याचा आरोप आहे. कोरोना संसर्गामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, याची जाणीव असतानाही त्यांनी महिला- पुरुषांची गर्दी जमवून शासनाच्या सुचनांकडे आणि पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन सोनवणे यांनी तक्रार दिली असून, उपनिरीक्षक शेवाळे आणि पवार तपास करीत आहेत.

 

संबंधित पोस्ट

महारेशीम अभियान २०२५;वर्षभरात २.२५ मे.टन धागा निर्मिती-जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

vishwatmaklokswamivarta

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू  यांचा आज (11 जानेवारी) सकाळी अपघात घडला. अपघात त्यांच्या डोके आणि पायाला मार लागला.  अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे

vishwatmaklokswamivarta

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख…

जिल्ह्यात 15 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला पायबंद घालण्यासाठी दुग्धव्यवसाय मंत्री श्री.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हास्तरीय समिती गट करण्याविषयी सूचित, धडक कारवाई सुरू

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतरांगेत नुकत्याच झालेल्या ६.० किंवा ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे किमान ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे २५०० हून अधिक लोक जखमी

vishwatmaklokswamivarta