vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्थापनेला १७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मोठी घोषणा

आपत्तीला सामोरं जाण्यासाठी जनतेला तयार करण्याची गरज – अमित शहा

दिल्ली प्रतिनिधी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्थापनेला १७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मोठी घोषणा केली आहे. २५ राज्यातील ३० पूरग्रस्त जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर आपत्ती मित्र ही योजना सुरु करण्यात आली आहे.

आपत्ती मित्र योजनेत ५ हजार ५०० आपत्ती मित्र आणि मैत्रिणींचा समावेश आहे. आता ही योजना ३५० आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

अमित शहा म्हणाले की, काही सेकंदात आपत्तीत काम सुरु करावं लागतं. हे काम जनताच करु शकते. गावागावात आपत्ती मित्रच हे करू शकतील. आपत्ती मित्र ही संकल्पना खूप चांगली आहे. आपत्तीला सामोरं जाण्यासाठी जनतेला तयार करण्याची गरज असल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग भारतात आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करते. यंदा स्थापना दिनाचा विषय हा हिमालयातील आपत्तीच्या घटनांचा होणारा परिणाम आहे. या कार्यक्रमात हिमालयातील भूस्खलन, ढगफुटी, भूकंप, ग्लेशिअर वितळून येणाऱ्या आपत्ती इत्यादींवर सविस्तर चर्चा होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

अयोध्येतलं राम मंदिर पूर्णत्वाकडे; आज योगी गाभाऱ्याची पायाभरणी करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) परिसरा’चे लोकार्पण केले.

vishwatmaklokswamivarta

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे शहरातील,दुय्यम निबंधक कार्यालयात मतदान जनजागृती

शिवसेना कोणाची याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी अंतिम सुनावणी होणार

आताची मोठी बातमी – धारावी बस डेपो जवळ गैस सिलेंडरच्या ट्रक मध्ये लागली आहे भीषण आग…

मुंबई महानगरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करणार… मंत्री एकनाथ शिंदे