vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आताची मोठी बातमी – धारावी बस डेपो जवळ गैस सिलेंडरच्या ट्रक मध्ये लागली आहे भीषण आग…

आताची मोठी बातमी – धारावी बस डेपो जवळ गैस सिलेंडरच्या ट्रक मध्ये लागली भीषण आग,आगीत ट्रक जाळून खाक, सुदैवाने दुर्घटनेत कोणी जखमी नाही…

 

 

( मुंबई अग्निशमन दल ,एमबुलेन्स आणि पोलीस घटनास्थळीआग विझविण्याचा प्रयत्न शुरु आहेमात्र आग लागल्याचा कारण अद्याप स्पष्ट नाही….)

मुंबई प्रतिनिधी-: धारावी , निसर्ग उद्यानाजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास एका ट्रकमधील गॅस सिलिंडरमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत सदर ट्रक जळून खाक झाला. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडून जीवित हानी झाली असती.

    महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, धारावी, ९० फिट रोड,पीएनजी कॉलनी, निसर्ग उद्यानाजवळ सोमवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास एका ट्रकमधील गॅस सिलिंडरमधून गॅस गळती लागून भीषण आग लागली. ही आग हळूहळू पसरली. त्यामुळे ट्रक जळून खाक झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी, रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सदर आगीवर रात्री उशिराने नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला.

ही आग का व कशी काय लागली याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक माहिती घेत आहेत.

संबंधित पोस्ट

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे राखीव प्रवर्गाचे 389 अर्ज प्राप्त- मेघराज भाते

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी,ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जून पर्यंत मुदत

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त  कवठेमहांकाळमध्ये युनिटी पदयात्रा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग, पुढील 48 तास महत्त्वाचे हवामान खात्याचा इशारा