vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सूचना व अभिप्राय मागवण्याकरिता दिनांक 3 जुलै 2026 रोजी कार्यशाळा

सूचना व अभिप्राय मागवण्याकरिता दिनांक 3 जुलै 2026 रोजी कार्यशाळा

            सांगली, द प्रतिनिधी : राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणा तयार करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याकरिता दिनांक 3 जुलै 2026 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे. तसेच दिनांक 30 जून 2026 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सांगली किंवा dwcdosangli@gmail.com या ईमेलवर सूचना व अभिप्राय पाठवावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.         प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र “एकल महिला धोरण” तयार करीत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक व्हावे यासाठी राज्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत.      एकल महिलांच्या समस्या केवळ मांडण्याऐवजी त्या समस्यांवर शासनाने कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणत्या नवीन योजना सुरू कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल करावेत, तसेच आवश्यक असल्यास कोणत्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात याबाबत सविस्तर सूचना पाठवाव्यात. सूचना पाठविताना केवळ त्रोटक स्वरूपातील मते न पाठविता, संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेले सविस्तर प्रस्ताव पाठवावेत. समाजातील एकल महिला तसेच सर्व संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग या धोरण निर्मिती प्रक्रियेत असणे आवश्यक आहे. त्यामुळे सूचना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ८२०८५८११९५ या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर अभिप्राय पाठवावा.
        प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करताना योग्य तो विचार करण्यात येईल. राज्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व विषयतज्ज्ञ यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- अपर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जंगी स्वागत

अमृत दुर्गोत्सव – पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती..

vishwatmaklokswamivarta