vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आ.खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्याचे मार्गावर**डीपीआर साठी प्रशासन झाले सज्ज*

आ.खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्याचे मार्गावर**डीपीआर साठी प्रशासन झाले सज्ज*

जालना प्रतिनिधी- जालना शहरातील आणि ग्रामीण भागात विजेच्या समस्येमुळे नागरिकांना आ. अर्जुन खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत प्रशासनाला या गंभीर घटनेकडे तातडीने लक्ष घालून अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी पावले उचलून विद्युत डीपीआर तयार करावा लागत आहेत , आ. अर्जुन खोतकर यांच्या भूमिकेला शहरातील आणि ग्रामीण भागातील जनतेने भरभरून पाठिंबा दिला आहे .

       गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे या त्रासाला कंटाळून विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी याबद्दल अनेक तक्रारी व आंदोलने केली होती परंतु विद्युत विभागाने याकडे कानाडोळा केल्यामुळे शहरातील दवाखाने छोटे-मोठे उद्योग आणि भर उन्हाळ्यात वयोवृद्ध आणि लहान बालकांना उन्हाचां भयंकर त्रास सोसावा लागला होता या सर्व बाबी गांभीर्याने घेऊन आ. अर्जुन खोतकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शहरातील विजेच्या प्रश्नावर शासनावर भडीमार करत हा प्रश्न आक्रमकपणे मांडल्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेऊन विद्युत विभागाचे मुख्य अभियंता आणि अन्य अधिकाऱ्यांना हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आदेशित केल्यामुळे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जालना येथे बैठकीत विद्युत विभागाचे सर्व जिल्ह्यातील जबाबदार अधिकारी आणि अभियंते यांनी आठ दिवसाच्या आत या समस्यांचे कायमचे निराकरण करण्यासाठी डीपीआर तयार करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे सांगितल्यामुळे यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे , श्री. खोतकर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत विजेचा गंभीर प्रश्न सोडविल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागांमध्ये त्यांचे विविध सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे जुना जालना भागात गेल्या अनेक महिन्यापासून अखंडित विद्युत पुरवठा आणि विजेचा लपंडाव पाहावयास मिळत होता , श्री. खोतकर यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे या भागातील नागरिक सुखावल्याचे पहावयास मिळते , आ‌. अर्जुन खोतकर यांनी या समस्यावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद , अहमद नूर , साईनाथ चीन्नदोरे , जिल्हा कार्याध्यक्ष मिर्झा अन्वर बेग , अजीम बागवान , वैभव नालेगावकर , जॉर्ज उगले , संतोष निकाळजे , शेख मुजमील , जावेद अली , बाबा पठाण , इमरान खान , शेख. अहमद , सिताराम तुपे , सिराज बागवान , माणिक चव्हाण आदींनी त्यांचे शाल व पुष्पहार घालून स्वागत करुन अभिनंदन केले .

00000

संबंधित पोस्ट

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन;जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक

कृषी केंद्रांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉसबसवावे*साठ्यामधील तफावतीमुळे कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नियोजन भवन येथे जलसंधारणासह विविध विकास कामांचा आढावा

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे रविवारी वितरण,सोहळ्यास बहुसंखेने उपस्थित राहा-प्रा.शरद वंजारे

vishwatmaklokswamivarta