vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक रिपोर्ट-  मुंबई महानगरपालिकेच्या गैर कारभाराचा भांडाफोड-पालिका नागरिक सेवा पुरवठ्यात आघाडी मात्र पर्यावरण आणि हवामान बदलाच्या बाबत उत्तरदायित्वात पिछाडी, प्रजा फाउंडेशन च्या नागरिक अहवालामध्ये धक्कादायक आकडेवारी सादर

 प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक रिपोर्ट-  मुंबई महानगरपालिकेच्या गैर कारभाराचा भांडाफोड-पालिका नागरिक सेवा पुरवठ्यात आघाडी मात्र पर्यावरण आणि हवामान बदलाच्या बाबत उत्तरदायित्वात पिछाडी, प्रजा फाउंडेशन च्या नागरिक अहवालामध्ये धक्कादायक आकडेवारी सादर

 

मुंबई प्रतिनिधी -प्रजा फाउंडेशन ने मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने तयार केलेल्या मुंबई नागरिक सेवा पर्यावरण व हवामान बदलाचे मुद्दे 20 26 या अहवालाचे आज प्रकाशन झाले यामध्ये मुंबईतील नागरिक सेवा ची स्थिती आणि पर्यावरणाची कामगिरी आणि हवामान बदलाला सामोरे जाण्याचा शहराच्या तयारीच्या सर्व कश मूल्यमापन करण्यात आले आहे,

कोस्टल रोड मेट्रो कॉरिडोर डिजिटल गव्हर्नर सिस्टम तसेच हवामान बदलाचा सामना करणारे महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबईमध्ये उभारले जात आहेत मात्र वेगाने दैनिक नागरिक सेवा ची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुधारते आहे का हा करा प्रश्न आहे आज जेव्हा चार वर्षाच्या अंतराने मुंबईत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यभार स्वीकारला आहे तेव्हा हा प्रश्न विचारणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच हे लोकशाही उत्तरदायित्व अधिक बळकट करून नागरिक केंद्री प्रशासनाला चालना देण्याची गरजेचे आहे

केवळ भौतिक पायाभूत सुविधा महान शहरे निर्माण होत नाहीत तर उत्तरदायी आणि जबाबदारी संस्था मुळे घडतात असे प्रतिपादन करून प्रजा फाउंडेशनचे संस्थापक मिताई मेहता म्हणाले की मुंबईच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी नागरिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासक यांच्या हातात विश्वासार्ह पुराव्यावर आधारित माहिती असणे आवश्यक आहे ज्यामुळे केवळ गृहीतकावर नव्हे तर वस्तुनिष्ठ त्यावर आधारित निर्णय घेतले जातील गेल्या दशकाभरात मुंबईत अनेक नागरिक सेवा पुरवठ्यामध्ये लक्षणीय सुधारणा केली असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे शहरातील कचरा निर्मिती 27% घट झाली घरातून कचरा संकलनाचे प्रमाण 80% वरून 100 पर्यंत वाढले कचरा वर्गीकरणाचे प्रमाण 27% वरून 86% पर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने कचराविले वाट लावण्याचे प्रमाण 30% वरून टक्के पर्यंत वाढले आहे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत

 नागरिकांचा सहभाग केवळ मतदानापुरता मर्यादित असता कामा नये असे मत व्यक्त करून प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद मस्के म्हणाले स्थानिक समस्या नोंदविणे प्रभागातील लोकप्रतिनिधीशी संवाद साधने सार्वजनिक चर्चा मध्ये सहभागी होणे आणि सार्वजनिक माहितीचा वापर करून संस्थांना उत्तरदायी करणे या अशा माध्यमातून नागरिकांचा सहभाग सातत्याने असायला हवा जेव्हा नागरिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्रितपणे काम करतात तेव्हा शासन अधिक पारदर्शक उत्तरदायी आणि परिणामकारक बनते लोकांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आणि मोजता येण्याजोग बदल घडून आणण्यासाठी नागरिकांचा माहितीपूर्ण आणि सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे

काही सुधारणा झाल्या असल्या तरी अनेक मूलभूत आणि दीर्घकालीन आव्हाने आहेत ज्याचा परामर्श या अहवालाने घेतला आहे मुंबईच्या नागरिक तक्रार निवारण व्यवस्थेत मध्ये विविध विषयावर नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारीमध्ये वीस सोळा ते वीस पंचवीस या कालावधीत 59% वाढ झाली आहे ज्यामध्ये प्रदूषणासंदर्भात तक्रारी मध्ये सर्वाधिक 531 टक्के वाढ झाली आहे त्या खालोखाल घनकचरा व्यवस्थापना संदर्भात तक्रारीमध्ये 281% वाढ झाली आहे याशिवाय पाणीपुरवठ्याच्या तक्रारीमध्ये 96% आणि प्रजन्य वाहिन्याच्या तक्रारीमध्ये 88% वाढ झाली आहे या नागरिक समस्याचे पूर्णतया निराकरण झाले नसल्याने या आकडेवारीतून दिसून येते तसेच नागरिकांमध्ये जागरूकता वाढल्याचे लक्षात येते अधिका अधिक नागरिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तक्रार नोंदवत आहेत यावरून नागरिक सेवाचा दर्जा आणि सुधारला पाहिजे ही त्याची अपेक्षा अधोरेखित होते मुंबईमध्ये कचरा व्यवस्थापन लक्षणीय सुधारणा झाल्या असल्या तरी राष्ट्रीय स्वच्छतेचे निष्कर्ष पूर्ण करण्यात आपण मागे आहोत हेही या अहवालासमोर आणले आहे स्वच्छ संरक्षण 20 24 डॅश 25 अंतर्गत मुंबईने  3 स्टार कचरा मुक्त शहर प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता मात्र शहराला एक स्टार प्रमाणपत्र मिळू शकले नाही माहिती अधिकाराच्या कायद्यातून मिळालेल्या माहितीनुसार घरातून कचरा संकलनाच्या निष्कर्षा पैकी मुंबईतून केवळ 40% उद्दिष्ट गाठले आहे या स्तोत्रावर कचरा वर्गीकरण 31 टक्के ओल्या कचऱ्याचे प्रक्रिया 62% आणि कचरा डेपोतून पुनर्वसनात केवळ 16% प्रगती साधली आहे विकेधीकंद विकेंद्रीकरण कचरा व्यवस्थापन कुमकुवत आहे मुंबईतील 27009 बल्क वेस्ट जनरेट ग्रह संकुलनापैकी केवळ 347 कंसात 13 टक्के संकुलनाचे त्याच्या परिसरात कचऱ्याचा प्रक्रिया करतात तर उर्वरित 87% संकुलाकडून अद्याप या नियमाचे पालन होत नाही

 शहरासमोरील इतर पर्यावरण आव्हानावरील अहवाल प्रकाश टाकतो ज्याच्यामध्ये नद्या समुद्रकिनारीचे प्रदूषण अपुरी सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था प्रदूषण नियंत्रण निष्कर्ष दावलून चालू असलेले मलन निसारण उपचार प्लांट मुंबई हवामान कृती आराखड्याच्या एम सी ए पी विस्कळीत अंमलबजावणी आणि कमजोर देखरेख आणि हवामान कृतीच्या उद्दिष्ट बाबत वार्षिक सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करण्यात होणारी दिरंगाई अशा महत्वपूर्ण बाबीचा समावेश याच्यात आहे या पार्श्वभूमीवर मुंबई हवामान कृती आराखड्या मधील निर्देशकांच्या वैधानिक पर्यावरण अहवाल समावेश करून हवामान बदलाबाबत एक संघ अहवाल सार्वजनिक रित्या जाहीर करावा अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे

मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट रु 80.863 कोटीपेक्षा अधिक आहे तेथे 87 हजार हून अधिक कर्मचारी काम करता त्यामुळे प्रभावी नागरिक सेवा देण्यासाठी पुरेशा संस्थात्मक क्षमता महानगरपालिकेकडे आहे या क्षमतेचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी सेवा वितरण व्यवस्थेचे मापनीय निष्कर्ष निर्धारित केले पाहिजेत परभाग स्तरीय उत्तरदायित्व सुनिश्चित केले पाहिजे हवामान बदलासाठी स्वतंत्र आणि अधिक सक्षम अर्थसंकल्पीय योजना व्हायला हवेत तसेच पुरावा आधारित नियोजन कामगारांची माहिती नियमित रित्या सार्वजनिक जाहीर करणारे व्यवस्था ओपन सिविक डॅशबोर्ड नागरिकांच्या अभिप्रायासाठी आणि सहभागासाठी संस्थात्मक यंत्रणाची उभारणी केली पाहिजे अशा शिफारशी या अहवालात करण्यात आल्या आहेत जवळपास चार वर्षाच्या अंतराने निर्वाचित नगरसेवकाचे पुनारक्रामण झाले आहे शहराचा कारभार सहभागी उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्याची ही महत्वपूर्ण संधी आहे त्याचे स्मरणही या अहवालात करून देण्यात येत आहे

पर्यावरण स्थितीत अहवालातील इएसआर अनेक पर्यावरणीय निर्देशांक मुंबई हवामान कृती आराखड्याशी सुसंगत आहे असे मत मांडून प्रजा फाउंडेशनच्या संशोधन व विश्लेषण विभागाचे व्यवस्थापक आसिफ खान म्हणाले की हवामान कृती आराखड्यामधील निदर्शकांचा पर्यावरण अहवालामध्ये समावेश केल्यास हवामान कृतीचे उद्दिष्टे किती साध्य झाली याचेही मोजमाप दरवर्षी होईल आणि जाहीर करता येईल ओपन सिविक डॅश बोर्ड द्वारे कामगिरीची माहिती सार्वजनिक केली जावी निवडणूक आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांचा वार्षिक आढावा घ्यावा आणि प्रभाग स्त्रिया मंच तसेच तक्रार निवारण यंत्रणेद्वारे नागरिकांनी या चर्चेत सक्रिय सहभागी व्हावे या प्रक्रियेतून हवामान बदला संदर्भात महापालिकेच्या उत्तरदायित्व व्यवस्था अधिक बळकट होईल

 याबाबत प्रजा फाउंडेशनने,

आपली शासन व्यवस्था जबाबदार आणि उत्तरदायी व्हावी या हेतूने प्रजा फाउंडेशन गेल्या दोन दशकापासून कार्यरत आहे नागरिक समस्या डेटा आधारित संशोधन करणे आणि संशोधनाचे निष्कर्ष लोकप्रतिनिधी नागरिक प्रसार माध्यमे प्रशासन अशा महत्त्वाच्या समाज घटकापर्यंत पोहोचवणे असे प्रजाच्या कामाचे स्वरूप आहे लोकप्रतिनिधी आणि कार्यपद्धती त्रुटी समजून घ्याव्यात आणि नवीन माहिती आधारे त्या दूर कराव्यात काळानुरूप आवश्यक सुधारणा कराव्यात यावर प्रजाच्या कामाचा मुख्य भर आहे वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे नागरिक सरकारची ताकद वाढविणे नागरिकांचे जीवन सुलभ करणे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडविण्यासाठी परिवर्तनाची साधने निर्माण करणे ही प्रजाची मुख्य उद्दिष्टे आहेत नागरिकांच्या सहभागातून एक उत्तरदायी आणि कार्यक्ष म समाज घडवण्यासाठी प्रजा नेहमी वचनबद्ध त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे मुंबई प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडण्यात आले प्रजा फाउंडेशन ने मांडलेल्या अनेक मुद्द्यांवर मुंबई महानगरपालिका प्रशासन काय कारवाई करेल याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे

संबंधित पोस्ट

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

vishwatmaklokswamivarta

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून बळीराजाला दिलासा देण्याच्या प्रयत्न – मंत्री चंद्रकांत पाटील – राज्यात ३६ हजार कोटींची कर्जमाफी; ५६ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ – अधिकाऱ्यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्याचे निर्देश

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश!आपला पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहिला यापेक्षा पालकांना दुसरा आनंद नसतो – भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta