vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूर, प्रतिनिधी) : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि अहमदपूर येथील शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदपूर येथील नांदेड रोडवर असलेल्या शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा मेळावा पार पडणार असून यामध्ये अनेक नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, कोणत्याही शाखेचे पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आय.टी.आय. तसेच डिप्लोमा धारक उमेदवारांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असणार आहेत.

 

तरी लातूर जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता स्वतःचा अद्ययावत रिझ्युम किंवा बायोडाटा, सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि पासपोर्ट साईझ फोटो यांच्या किमान तीन प्रतींसह मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे. या मेळाव्या संदर्भात काही अडचण किंवा अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी कार्यालयीन कर्मचारी दत्तात्रय कांबळे (भ्रमणध्वनी क्र. ९०२८२३८४६५), लहू भंडारे ( भ्रमणध्वनी क्र. ८०५५९९२९००) किंवा प्रविण वाघमारे (९९२२९२५८९५) यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रने शनिवार वाडा येथून पुणे-दिल्ली सायकल मोहीम ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ ला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

vishwatmaklokswamivarta

भोजापूर प्रकल्पाचा नदीजोडमधील समावेशासाठी आराखडा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील ११ वंचित गावांसाठी सर्वेक्षणाचे आदेश

vishwatmaklokswamivarta

तालुका व गावपातळीवर आढावा घेऊन मान्सुन पूर्व तयारीचे आराखडे 20 मे पूर्वी सादर करावेत**-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील – मंत्री मकरंद पाटील

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta