vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

ठाणे – प्रतिनिधी –

श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल आझादनगर, चितळसर मानपाडा, ठाणे या शाळेच्या ११० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन’ आणि ‘राजरानी फाऊंडेशन’ या दोन प्रसिद्ध सेवाभावी संस्थेतर्फे हे गणवेश देण्यात आले. ‘महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष, वरिष्ठ समाजसेवक महेश अग्रवाल आणि ‘राजरानी फाऊंडेशन’ची अध्यक्षा रानी पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी मागसवर्गीय क्षेत्रात असलेले ४७ वर्ष जुनी श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल या शाळेत सदिच्छा भेट दिली होती.

या भेटी दरम्यान त्यांना बरेच गरजू विद्यार्थी आढळून आले होते. या विद्यार्थ्यांची अर्थिक परिस्थिती पाहून असे ११० मुली/मुले यांना गणवेश देण्याचे ठरवले होते. गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपच्या वेळी शाळेतर्फे शिप्रा डे, अभय पांडेय, रामकेर शर्मा, राजेश पांडेय आणि साधना मिश्रासह अनेक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

एकुण ११० मुली/मुलांना मोफत गणवेश वाटपानंतर संस्थेतर्फे संतोष पांडेय यांनी महेश अग्रवाल आणि राणी पांडेय यांचे विशेष आभार मानले. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.-

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे    – *विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी**अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये, सूक्ष्म नियोजनाचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अजित अनंतराव पवार जयंतीनिमित्त अभिवादन

विवेकवादी चळवळीच्या बळकटीसाठी अंनिस मुंबई जिल्ह्याची दोन दिवसीय चिंतन बैठक संपन्न

जेष्ठ नागरिक चर्मकार बांधवांचा स्टॉल मूळ जागेपासून हलवल्यामुळे समाजात तीव्र नाराजी संताप..

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाई तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना..

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा