vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

शिर्डी, प्रतिनिधी: राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिपत्याखालील उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे प्रशासकीय बदलीने नियुक्त झालेल्या डॉ. मीरा ढास यांनी आज माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

डॉ. ढास या जुलै २००८ मध्ये शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात उपसंपादक म्हणून मंत्रालय, मुंबई येथे रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, पुणे तसेच विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथे सहाय्यक संचालक म्हणून कार्य केले. पुढे जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्या जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तेथून प्रशासकीय बदलीने त्यांची उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. मीरा ढास यांनी श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. मीरा ढास यांनी सांगितले की प्रभावी संवाद कौशल्याच्या आणि विविध समाज माध्यमातून शासनाच्या जन कल्याणकारी योजना व विविध उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिर्डी हे ठिकाण श्री साईबाबा यांच्या पावन भूमीमुळे प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येत असतात.साई भक्तांसाठी, आणि नागरिकांसाठी शासन विविध स्तरावरून सुविधा उपलब्ध करुन देत आहे. या उपक्रमाला लोकांसमोर सकारात्मक पद्धतीने आणण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उप माहिती कार्यालय, शिर्डी येथील कर्मचारी श्री. मंगेश रसाळी व श्री. अभिजीत मुठे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. मीरा ढास यांचे स्वागत केले तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.- उप माहिती कार्यालय, शिर्डी

संबंधित पोस्ट

विशेष लेख**देशी गोवंशाच्या संरक्षणाला चालना; गायींच्या परिपोषणासाठी अनुदान योजना*

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

मराठी भाषेवर कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सजग राहण्याचे आव्हान-कौतिकराव ठाले पाटील

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन