vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

अवयवदान पंधरवड्यानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा

अवयवदान पंधरवड्यानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा

बुलढाणा, प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने साजऱ्या करण्यात येत असलेल्या अवयवदान पंधरवडा निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील नेत्ररोग विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा घेत समाजात अवयवदानाबाबत जनजागृतीचा संदेश दिला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित कार्यक्रमात अवयवदानाचे सामाजिक महत्त्व, मृत्यूनंतर अवयवदानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते, तसेच नेत्रदानासह विविध अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज यावर मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

याप्रसंगी नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करून गरजूंना जीवनदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे, डॉ. भिलावेकर, नोडल अधिकारी अविनाश चिंचोले, जि. वि. मा. अ. धुतडमल, नेत्रदान समुपदेशक योगेश सिरसाट, डॉ. तोडकर, सौरभ हिवाळे, सवडतकर तसेच नेत्ररोग विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

🦟🚨 राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती मोहिम📉 डेंग्यू रुग्णसंख्येत घट; नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात – डॉ. सुजिता वाडीवे

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम तंबाखूचे अतिसेवन म्हणजे अनंत आजारांना निमंत्रण राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम…

संपूर्ण नवी मुंबईत विविध विभागांत विठ्ठलनामाची शाळा भरवित विद्यार्थ्यांनी दिंड्यांतून जागविले स्वच्छता व आरोग्याचे महत्व…

शारदीय नवरात्रौत्सवात जागर महिला आरोग्याचा विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया -प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके 

vishwatmaklokswamivarta