vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आधी शेतरस्ते खुले केले, आता गरिबांच्या लेकरांच्या शाळा समृद्ध करणार!-जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी सतीश घाटगे यांचा पुढाकार.

आधी शेतरस्ते खुले केले, आता गरिबांच्या लेकरांच्या शाळा समृद्ध करणार!-जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी सतीश घाटगे यांचा पुढाकार! : पाथरवाला खुर्द येथील शाळा घेतली दत्तक

 

अंबड : प्रतिनिधी ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मजबूत आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत. या शाळा टिकवण्यासाठी अनेक गावांतील ग्रामस्थ स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना बळ देण्यासाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. शेकडो किलोमीटरचे शेतरस्ते खुले करणाऱ्या सतीश घाटगे यांनी आता जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्याचे मिशन हाती घेतले असून, पाथरवाला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा त्यांनी दत्तक घेऊन शाळेला समृद्ध करण्याची घोषणा केली

पाथरवाला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेसाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून जमेल तेवढी मदत केली. गावकऱ्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी सतीश घाटगे यांनी शाळेला भेट देत सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी शिक्षक तसेच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि गरजा जाणून घेतल्या. तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आणि समृद्धी साखर कारखान्याच्या सहकार्याने पाथरवाला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद शाळेच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त करत सतीश घाटगे यांचे आभार मानले.

यावेळी गावचे सरपंच, शालेय समितीचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा हायटेक बनवणार – सतीश घाटगे

शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी हायटेक क्लासरूम, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टरची व्यवस्था, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था, सुसज्ज स्वच्छतागृह तसेच नवीन शाळा इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक ती मदत करण्याचा शब्द सतीश घाटगे यांनी यावेळी दिला.

 

संबंधित पोस्ट

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क- हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी  जिल्ह्यातील १५ उपकेंद्रांभोवती प्रतिबंधात्मक आदेश..

सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त  कवठेमहांकाळमध्ये युनिटी पदयात्रा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी२० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन