vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील वांद्रे येथील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी करावी-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबईतील वांद्रे येथील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी करावी-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, प्रतिनिधी वांद्रे (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फूट ओव्हर ब्रिजवरील डिजिटल एलईडी जाहिरात फलकांची परवानगी, वैधता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सखोल चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले

विधानभवन येथे अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुंबई महानगरपालिका, एमएसआरडीसी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या फलकांवरील सतत बदलणाऱ्या जाहिराती व व्हिडिओंमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली.

जाहिरात फलकांच्या परवानगी प्रक्रियेतील कागदपत्रे, निविदा प्रक्रिया तसेच माहिती अधिकारांतर्गत मागविलेली संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

एमएसआरडीसीने सात दिवसांत संबंधित विभागांची बैठक घ्यावी. या बैठकीस वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित करून फलकांची वैधता, परवानगी प्रक्रिया आणि वाहतूक सुरक्षेचा आढावा घ्यावा तसेच सविस्तर अहवाल सादर करावा, असे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे येथे उपमुख्यमंत्र्यांकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल राज्यपालांकडून स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप…

बाळगंगा नदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री मकरंद जाधव-पाटील

आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा व विमान उड्डाणे सुरू

vishwatmaklokswamivarta