vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई उपनगर जिल्ह्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) उच्च शिक्षण घेणाऱ्या, मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यात येत आहे. तसेच भटक्या जमाती-क (एनटी-सी) प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी या योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रांचा एक संच सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी.चेंबुरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०००७१ येथे जमा करावा.
तरी महाविद्यालय स्तरावर या योजनांसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज भरून या योजनांचा लाभ घ्यावा, तसेच महाविद्यालयांनी याबाबत पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने काण्यात आले आहे.
0000

संबंधित पोस्ट

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन-विविध योजनांच्या प्रचार-प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात महाप्रसाद तयार करण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर सक्तीचा

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण घेण्याचे पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

भास्कर आबा दानवेंच्या पुढाकाराने भाविकांच्या तीर्थयात्रेसाठी दोन बस उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द