vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद• सहा विभागांना याच महिन्यात भेटी• विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद• सहा विभागांना याच महिन्यात भेटी• विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.    या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे…

कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबईई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूरई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६स्थळ : अमरावतीई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगरई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६ स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in    नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.    या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.   भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

Train-to-Trainer’ उपक्रमांतर्गत बुलढाण्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

तांदुळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून’प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटीचा प्रश्न थेट मुंबईत; उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर दखल ,परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन माइंड यांच्याकडून तक्रारीची दखल बंद बससेवा व प्रवाशांच्या तक्रारींची चौकशी होणार निवेदन जालना विभागाकडे वर्ग करून कार्यवाहीचा अहवाल मागविला…