vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास ११ सप्टेंबरपर्यंत मुदत

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास ११ सप्टेंबरपर्यंत मुदत

 

बुलढाणा, प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या वतीने सन २०२५ पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी अर्ज सादर करण्याची मुदत 11 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे.

यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली असून जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता यावे, या उद्देशाने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आता शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना आता शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२:०० पर्यंत अर्ज सदर स्पर्धेसाठी अर्ज सादर करता येणार आहे.

या स्पर्धेसाठीचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. तरी बुलढाणा जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके पटकावावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

राज्यातील जनतेला रमजान ईदच्याशुभेच्छा,मानवकल्याण, विश्वबंधुत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया – उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार 

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील राज्य परिवहन महामंडळ आगार व न्यायालय इमारत बांधकामांची पाहणी..

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

बेस्ट बसने प्रवास करणे महाग …बेस्ट बस भाडे दुप्पट  ९ मे २०२५ पासून लागू होईल. या वाढीव भाड्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर

कन्यादान योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

vishwatmaklokswamivarta