vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि  वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि  वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

राज्य प्रतिनिधी-लातूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मे महिन्यात राबविलेल्या विशेष मोहिमेत बेकायदेशीररीत्या वाळू, दगड आणि मुरूम यांची वाहतूक करणारी एकूण ४ वाहने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती लातूरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सौदागर तांदळे यांनी दिली आहे.

या मोहिमेदरम्यान एकूण ३ हायवा आणि १ टिप्पर या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एच-२४ बीडब्ल्यू-७७७३ या हायवा वाहनातून ४ ब्रास वाळूची अवैध वाहतूक केली जात होती. याप्रकरणी संबंधिताकडून ३ लाख १५ हजार ६२० रुपये इतका दंड शासन खाती जमा करण्यात आला आहे. तसेच एमएच-४२ टी-०७७५ या हायवा वाहनातून ५ ब्रास मुरूम नेला जात असताना कारवाई करण्यात असून याप्रकरणी २ लाख २९ हजार ७७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

एमएच-२२ एन-१२५१ या टिप्परवर ३ ब्रास दगडाच्या अवैध वाहतुकीसाठी कारवाई करण्यात आली असून, सध्या या दंडात्मक वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच केए-२८ सी- ७३६७ या हायवा वाहनावर ४ ब्रास वाळूच्या वाहतुकीसाठी कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातील कायदेशीर कार्यवाही देखील प्रगतीपथावर आहे. यापुढेही तालुक्यातील अशा अवैध प्रकारांवर महसूल विभागामार्फत कारवाई केली जाणार आहे, असे तहसील कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे

****

संबंधित पोस्ट

शिवमय वातावरणात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा◾ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव…

vishwatmaklokswamivarta

रायसेन येथील प्रगत कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांकडून मिळणार मार्गदर्शन: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार

vishwatmaklokswamivarta

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगफुटी; पावसात २ जणांचा मृत्यू ♦️उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये १८ जणांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला प्रभावित भागात मदत आणि बचावकार्य सुरु.

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

11 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आदर्श आचारसंहिता लागूØ 4,76,855 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, नामनिर्देशनपत्र ऑनलाईन दाखल करावे लागणार 141 प्रभागातून 286 सदस्य निवडले जाणार;145स्त्रीयांसाठी राखीव, दुबार नाव असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणारØ आचारसंहितेसाठी 1950/1077 हेल्पलाईन नंबर जारी

vishwatmaklokswamivarta