vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

घणसोली विभागातील वारलीपाडा रबाळे परिसरात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण

घणसोली विभागातील वारलीपाडा रबाळे परिसरात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   दिवसभर कामावर जाणा-या नागरिकांना तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वांनाच सोयीचे व्हावे यादृष्टीने दुपारनंतरच्या वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध होण्याकरिता सुरू करण्यात येत असलेली शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राची सुविधा अत्यंत महत्वाची आणि लाभदायी असून याचा उपयोग परिसरातील नागरिकांच्या प्राथमिक आजारांवरील उपचारांसाठी चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास व्यक्त करीत महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रमांतून साजरा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घणसोली विभागात अश्विननगर वारलीपाडा परिसरात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी महापौर महोदया आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी आरोग्य समितीचे सभापती डॉ.जयाजी नाथ, समाजकल्याण समिती सभापती श्रीम.रंजना सोनवणे, माजी महापौर तथा नगरसेवक श्री.सुधाकर सोनवणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन चिटणीस, विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त श्री.संजय तडवी, कार्यकारी अभियंता श्री.यशवंत कापसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          केंद्र सरकारकडून 15 व्या वित्त आयोगांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर झालेली असून सकाळी 11 ते सायं. 7 या वेळेत ही केंद्रे सुरू असणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना संध्याकाळच्या वेळेतही आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच तसेच सोयीच्या वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याचा आनंद स्थानिक नागरिकांच्या वतीने व्यक्त करीत माजी महापौर तथा नगरसेवक श्री.सुधाकर सोनवणे यांनी हा येथील नागरिकांसाठी मोठा दिलासा असल्याचे सांगितले.

          आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य समिती काम करीत असल्याचे सांगत या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले.

          या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये डॉक्टर तसेच नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची उपलब्धता असणार असून केंद्रामार्फत नागरिकांना असंसर्गजन्य रोगांची तपासणी, प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन तसेच गरोदरपण आणि बाळंतपणातील काळजी, नवजात शिशू आणि बाळांच्या आरोग्य सेवा, बालके आणि किशोरवयीन यांच्या आरोग्य सेवा, मुलभूत मौखिक आरोग्य सेवा अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे, संसर्गजन्य आजारांपासून बचाव कसा करावा, वैयक्तिक स्वच्छता आणि पोषणाचे महत्त्व याबद्दलही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

          याप्रसंगी महापौर महोदया व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. श्री.सुधाकर सोनवणे यांनी अत्यंत नियोजनबध्द रितीने विकसित केलेल्या दाट वनराई क्षेत्रात हे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र असल्यामुळे येथे उपचारासाठी येणारे रूग्ण येथील हिरवेगार वातावरण पाहूनच अर्धे बरे होतील असे भाष्य महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी यावेळी केले.

संबंधित पोस्ट

आरोग्य – सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार – डॉ. स्वानंद सोनारजिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठकनिरामय अहिल्यानगर अभियान’वर सविस्तर चर्चा

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी..

गर्भधारणापूर्व व प्रसुतिपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदयाच्या कार्यशाळेस डॉक्टरांचा उत्तम प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

vishwatmaklokswamivarta

मरावे परी देहरुपी उरावे..!अवयवदान करा.. अवयवदान करा..!कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी आहे…

vishwatmaklokswamivarta

17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान

vishwatmaklokswamivarta