
जिल्हा परिषदेत मानवी रांगोळीद्वारे ‘सेवा संकल्प अभियान’ ची सुरुवात
जालना( प् प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील 25 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त तसेच सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ जलदगतीने पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ या देशव्यापी जिल्हास्तरीय अभियानाची सुरुवात आज येथील जिल्हा परिषदेत मानवी साखळी व रांगोळी उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारीया, परिविक्षाधीन अधिकारी आर. रंगामंजू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, मुख्य लेखा वित्त अधिकारी राधाकिसन राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राष्ट्रीय प्रतिके आणि विकसित भारताची संकल्पना या विषयावर आधारीत मानवी रांगोळीचा उपक्रम राबविला.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातुन 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत जालना जिल्ह्यात जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर ‘सेवा सेतू शिबिरे’ आयोजित करण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देणे, कार्यालयांमधील प्रलंबित कामांचा गतीने निपटारा करणे, ‘नाविन्यपूर्ण संकल्पना’ मांडण्यासाठी इनोव्हेशन चॅलेंज, ‘सेवा माझे योगदान’, स्वच्छता मोहीम आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे
यावेळी कार्यक्रमास कार्यकारी अभियंता जंजाळ, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, गटविकास अधिकारी ऋषिकेश टेकाळे, सहायक गटविकास अधिकारी गजानन पाखरे, संपर्क अधिकारी भगवान तायड यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.



