vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्या निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचे आवाहन

जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्या निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी- जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षणाला चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांर्भीयाने घेत या प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे प्रशिक्षणादरम्यान प्रक्रियेची अचूक माहिती समजून घेतल्यास पुढील टप्प्यातील कामकाजात अडचणी येणार नाहीत आणि जनगणनेचे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल, असे प्रतिपादन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले. हेडींग तयार करुन द्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जनगणना कार्य संचालनालय, मुंबईचे सहायक संचालक तेजल कटारे, ए. डी. सी. ओ. तुषार पाटील, विशेष कार्यकारी दंडाधिकारी वैभव पिलारे, सर्व चार्ज अधिकारी तथा तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, जनगणना कर्मचारी आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील म्हणाले, जनगणनेच्या पहिल्या टप्यातील घरांची यादी व घरगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेस सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारी म्हणून इन्युमरेशन ब्लॉकची निर्मिती व संक्षिप्त गृहसूची तयार करण्याच्या अनुषंगाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील टण्यातील अनुभव लक्षात घेता, पुढील टप्यातही सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अग्रस्थानी यावे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन

कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देशभरातील 83 शहरांमधील 2,072 केंद्रांवर नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 चे आयोजन

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे केंबुर्ली येथे एकूण 1 हजार 480 बॉक्स अवैधरित्या विदेशी मद्यसाठा जप्त

vishwatmaklokswamivarta

बीड नगरपरिषदेत विविध विकासकामांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जिल्ह्यात प्राणी कल्याण कायद्याच प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta