vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळेकेंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळेकेंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न

रायगड-अलिबाग,1 प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील भूजल संसाधनांचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अहवालातील वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्ह्यातील भूजल व्यवस्थापनासाठी हा अहवाल अत्यंत उपयुक्त असून, त्यातील निष्कर्षांचा विकासकामे व नियोजनात उपयोग करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) तर्फे राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) अंतर्गत अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह जिल्हा व राज्यस्तरीय विविध शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होतभूजल उपलब्धता व जलधारक स्तरांची वैज्ञानिक माहिती

कार्यशाळेच्या प्रारंभी केंद्रीय भूजल मंडळ, पुणेच्या पौर्णिमा बराहाते यांनी रायगड जिल्ह्यातील जलधारक स्तरांचे नकाशांकन विषयावर सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील भूजल उपलब्धता, जलधारक स्तरांची स्थिती, भूजल पातळी, भूजल गुणवत्ता, पुनर्भरण क्षमता, भूजल उपशाची स्थिती तसेच विविध भागांतील भूजल व्यवस्थापनाच्या गरजांबाबत वैज्ञानिक माहिती सादर करण्यात आली.

NAQUIM अंतर्गत संकलित माहितीचा नियोजनासाठी उपयोगहेमलता व्ही. यांनी NAQUIM अंतर्गत माहिती प्रसार विषयावर सादरीकरण केले. कार्यक्रमांतर्गत संकलित व विश्लेषित केलेल्या वैज्ञानिक माहितीचा उपयोग जिल्हा प्रशासन तसेच विविध विभागांच्या नियोजन प्रक्रियेत कशा प्रकारे करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विभागीय समन्वयातून भूजल संवर्धनावर भर,कार्यशाळेत कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच इतर संबंधित जिल्हा व राज्यस्तरीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले. स्थानिक भूजल परिस्थितीचा विचार करून विविध विभागांच्या योजनांमध्ये जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि भूजल स्रोतांचे संरक्षण याबाबत उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

भूजल संवर्धन व शाश्वत वापरासाठी अहवालाचा उपयोग

NAQUIM अंतर्गत तयार करण्यात आलेली माहिती भूजल संवर्धन, कृत्रिम भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण, सिंचन नियोजन तसेच भूजलाच्या शाश्वत वापरासाठी उपयुक्त ठरणार आहे. या वैज्ञानिक माहितीचा संबंधित विभागांनी त्यांच्या नियोजनात समावेश केल्यास भूजल संसाधनांच्या प्रभावी व्यवस्थापनास मदत होईल. भूजल हे पिण्याचे पाणी, शेती आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन असल्याने त्याचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यशाळेमुळे रायगड जिल्ह्यातील भूजल संसाधनांबाबत उपलब्ध वैज्ञानिक माहितीचा प्रत्यक्ष नियोजन व विकासकामांमध्ये उपयोग होण्यास चालना मिळणार असून, भूजल संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी विभागीय समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

000

संबंधित पोस्ट

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

येत्या शुक्रवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा कामकाज

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीला गती द्या – पालकमंत्री गिरीश महाजन कुंभमेळा प्राधिकरणातर्फे पूर्वतयारी आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*