vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प अभियानातून चालक-वाहक व रिक्षाचालकांना मार्गदर्शन दहिवडी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना परावर्तकाचे महत्त्व समजावले

सेवा संकल्प अभियानातून चालक-वाहक व रिक्षाचालकांना मार्गदर्शन दहिवडी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना परावर्तकाचे महत्त्व समजावले

 

सातारा प्रतिनिधी – सेवा संकल्प अभियानांतर्गत दहिवडी (ता. माण) येथील एसटी बस आगारात चालक व वाहकांना प्रवासी सेवा, सुरक्षित वाहनचालक आणि प्रवाशांशी सौजन्यपूर्ण व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी बस आगारास भेट देऊन चालकांच्या कामकाजाची माहिती घेतली तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या चालकांचा सत्कार केला.

यावेळी वाहन चालविताना प्रवाशांशी संयमाने व सौजन्याने संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले. ‘डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर’ ठेवून प्रवाशांशी सकारात्मक व सहकार्याची भूमिका ठेवावी, असे मार्गदर्शन चालक व वाहकांना करण्यात आले.

मोटार वाहन निरीक्षक शफिक उचगावकर यांनी एसटी महामंडळात दाखल झालेल्या नवीन बसेसची योग्य पद्धतीने हाताळणी, वाहनाची सुरक्षितता आणि चालक-वाहकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती दिली.या उपक्रमासाठी माण तालुक्याचे तथा सध्या सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे तसेच माण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व राज्यस्तरीय हॉलीबॉल खेळाडू विकास गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

अलिबाग येथील उदया बाजारला पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांची सदिच्छा भेट 

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

♦️आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठुरायाचं २४ तास दर्शन सुरु.

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचे निलंबन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे