vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी**६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित**१० हजार ८९४ रक्ततपासण्या; ६९० जणांचे रक्तदान, २ हजार ३२ नागरिकांची आभा कार्डसाठी नोंदणी*

*‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी**६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित**१० हजार ८९४ रक्ततपासण्या; ६९० जणांचे रक्तदान, २ हजार ३२ नागरिकांची आभा कार्डसाठी नोंदणी*

गडचिरोली, प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.० (२०२६)’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दि. २३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात आयोजित ६५० आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पुढील उपचारांची आवश्यकता आढळलेल्या ५०६ रुग्णांना शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ सप्टेंबरपासून हे अभियान राबविण्यात आले. ग्रामीण, शहरी तसेच दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरात आरोग्य तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, आवश्यक तपासण्या व औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत देखील या शिबिरांचे आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या समन्वयातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.

*४८ हजार २९६ नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ*अभियानांतर्गत दि. २३ सप्टेंबरपर्यंत एकूण ६५० आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये २० हजार ९०३ पुरुष, २१ हजार ३०३ महिला आणि ६ हजार ९० बालके अशा एकूण ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.शिबिरांमध्ये विविध आजारांच्या निदानासाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. कायचिकित्सा विभागांतर्गत १२ हजार २४२, बालरोग विभागात ३ हजार ६९३, स्त्रीरोग विभागात ३ हजार ७८, नेत्रविकार विभागात २ हजार ३३१, अस्थिरोग विभागात १ हजार ९७७, त्वचारोग विभागात १ हजार ९२५, कान-नाक-घसा विभागात १ हजार १९६ आणि शल्यचिकित्सा विभागात ८४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हृदयविकारासंदर्भात १ हजार १०४ नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर इतर आजार व व्याधींसाठी ३ हजार ९९७ नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यात आली.१० हजार ८९४ रक्ततपासण्या; १ हजार २०३ ईसीजीरोगनिदानासाठी आवश्यक तपासण्यांवरही अभियानात विशेष भर देण्यात आला. एकूण १० हजार ८९४ नागरिकांची मोफत रक्ततपासणी करण्यात आली, तर आवश्यकता आढळलेल्या १ हजार २०३ नागरिकांची ईसीजी तपासणी करण्यात आली.आरोग्य तपासणीसोबत रक्तदानाविषयीही जनजागृती करण्यात आली. विविध शिबिरांच्या माध्यमातून ६९० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

आभा आणि आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणीनागरिकांना शासकीय आरोग्य सुविधांशी जोडण्यासाठी अभियानादरम्यान विशेष नोंदणी करण्यात आली. त्याअंतर्गत २ हजार ३२ नागरिकांची ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करण्यात आली, तर १ हजार ८८२ नागरिकांची आयुष्मान भारत अंतर्गत ‘गोल्डन कार्ड’साठी नोंदणी पूर्ण करण्यात आली.५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भितशिबिरांमध्ये केवळ प्राथमिक तपासणी न करता आजाराचे निदान झाल्यानंतर आवश्यक रुग्णांना पुढील उपचार व्यवस्थेशी जोडण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार पुढील अथवा उच्चस्तरीय उपचारांची आवश्यकता आढळलेल्या ५०६ रुग्णांना शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. यापैकी ५३ रुग्णांना अँजिओग्राफी व आवश्यक विशेष तपासण्यांसाठी पाठविण्यात आले आहे.८५ नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा नोंदविली*अभियानाच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या आवाहनाला प्रतिसाद देत ८५ नागरिकांनी अवयवदानासाठी प्रतिज्ञा नोंदविली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अभियानाच्या अंमलबजावणीबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. सर्वसामान्य व गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरात मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना आवश्यक पुढील उपचारांशी जोडणे हा प्रशासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत योगदान देणारे गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संस्था, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचे कौतुक केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, शिबिरांमध्ये गंभीर आजारांचे निदान झालेल्या पात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून आवश्यक उपचारांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ आणि ‘सेवासंकल्प अभियानाच्या’ माध्यमातून आरोग्य तपासणीबरोबरच आवश्यक निदान चाचण्या, रक्तदान व अवयवदान जनजागृती, आरोग्य योजनांसाठी नोंदणी आणि गरजू रुग्णांना पुढील उपचार व्यवस्थेशी जोडण्याचे काम करण्यात आले.

संबंधित पोस्ट

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;10 मे पर्यंत अंतिम मुदत

जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न कावीळ संसर्ग कमी करण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे

राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विद्युतपुरवठा खंडित,युद्ध पातळीवर सुरळीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

vishwatmaklokswamivarta

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta