vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अनावरण

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अनावरण

मुंबई प्रतिनिधी-महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नागरिकांनी या विशेष टपाल तिकिटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्यगणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्याचे जतन व संवर्धन करणे आणि जागतिक स्तरावर त्याला स्थान मिळवून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी नमूद केले.

‘लोककलेतील श्रीगणेश’ या संकल्पनेवरील ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे कायमस्वरूपी स्मृतिचिन्ह ठरणार असून, त्यातून नव्या पिढीत फिलाटेलीची आवड निर्माण होण्यास मदत होईल, असे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये यांनी सांगितले.

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती संकलन सुरू असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

दै. मराठवाडा साथी”चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर येथे आज अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार- मंत्री उदय सामंत

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईतून धक्कादायक बातमी वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक

vishwatmaklokswamivarta

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत नविन पदांना मान्यता नकोआमदार सुधाकर अडबाले यांचे मंत्र्यांना निवेदन