vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाघ्रूळ येथे अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा व रांगोळी प्रदर्शन उत्साहात संपन्न,अंगणवाडी सेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे, त्यांच्या कार्याचा सन्मान हीच खरी कृतज्ञता – भास्कर आबा दानवे

वाघ्रूळ येथे अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा व रांगोळी प्रदर्शन उत्साहात संपन्न,अंगणवाडी सेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे, त्यांच्या कार्याचा सन्मान हीच खरी कृतज्ञता – भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी): आज वाघ्रूळ येथे भारतीय जनता पार्टी जालना महानगर च्या जालना ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान व आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या त्याचबरोबर वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. शुभांगीताई देशपांडे, सरचिटणीस वसंत शिंदे, सुनील पवार, भागवत बावणे, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे तसेच दिपाली बिनीवाले, रश्मी टेकवाणी, स्नेहा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमास सुधाकर खरात, सतीश केळकर, नागेश अंभोरे, कृष्णा खिल्लारे, बद्रीनाथ वाघ, सतीश जारे, विठ्ठल इंदलकर, विकास कदम, करण निकाळजे, गोविंद खरात, राधेशाम खरात, शरद खरात, रामजी खरात, जगन्नाथ खरात आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना भास्कर आबा दानवे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यामध्ये अंगणवाडी सेविका महत्त्वाची भूमिका बजावतात, ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचेही सांगण्यात आले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीला चालना मिळते असे त्यांनी सांगितले.

यावेळी सुषमा खरात म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि जनकल्याणकारी योजनांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सुषमा गजानन खरात, अध्यक्ष, महिला मोर्चा, ग्रामीण महानगर मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नमुंमपा नगररचना विभागात नियुक्तीसाठी स्थापत्य अभियंत्यांना द्यावी लागणार परीक्षा…

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम 

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर…

vishwatmaklokswamivarta