vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बंद बसफेरी पूर्ववत-जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर–मार्गे शिर्डीपर्यंत विस्तार—भाविक,रुग्णांसह ग्रामीण प्रवाशांना दिलासा-उपतालुका प्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या ठाम भूमिकेने बससेवेला मिळाली नवी दिशा!

बंद बसफेरी पूर्ववत-जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर–मार्गे शिर्डीपर्यंत विस्तार—भाविक,रुग्णांसह ग्रामीण प्रवाशांना दिलासा-उपतालुका प्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या ठाम भूमिकेने बससेवेला मिळाली नवी दिशा!

भोकरदन, प्रतिनिधी)-जाफराबाद आगाराची बंद झालेली जाफराबाद–छत्रपतीसंभाजीनगर बससेवा २४ सप्टेंबरपासून पूर्ववत करण्यात आली असून, या फेरीचा नेवासा–श्रीरामपूरमार्गे शिर्डीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे जाफराबादसह माहोरा, बरंजळा साबळे, नळणी, जवखेडा ठोंबरे, केदारखेडा,राजूर,तळेगाव, फुलंब्री आदी भागातील नागरिकांना छत्रपती संभाजीनगरपुढे नेवासा,श्रीरामपूर आणि शिर्डीपर्यंत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या बसफेरीतील प्रवाशांच्या अडचणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांनी जालना विभागीयकार्यालयाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. ५ सप्टेंबर रोजी त्यांनीनिवेदन देऊन बससेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्यात राजूर येथेप्रवाशांना बसमधून खाली उतरविण्याच्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला होता.त्यानंतर जालना विभागीय कार्यालयाने ९ सप्टेंबर रोजी संबंधित आगार व्यवस्थापकांना चौकशी करून चालक व वाहकांचे जबाब नोंदविण्याचे तसेच नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बंद फेरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.सर्व अधिकृत थांब्यांवर बस थांबविण्याच्या सूचना पुर्ववत सुरू झालेल्या फेरीत मार्गावरील सर्व अधिकृत थांब्यांवर बस थांबवून प्रवाशांना चढ-उताराची सुविधा देण्याच्या सूचना चालक व वाहकांना देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार, रुग्णआणि सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे.शिर्डीपर्यंत विस्तारामुळे भाविक व रुग्णांना लाभ बससेवेचा शिर्डीपर्यंत विस्तार झाल्याने श्री साई बाबांच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसह शिर्डी परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थेट सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा विस्तार धार्मिक तसेच वैद्यकीय प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबत अर्जुनठोंबरे-पाटील म्हणाले, ‘बससेवा पुन्हा सुरू झाल्याचा आनंद आहे; मात्र ती नियमितपणे आणि प्रत्येक अधिकृत थांब्यावर प्रवाशांना मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. शिर्डीपर्यंत झालेल्या विस्तारामुळे भाविक आणि रुग्णांनाही सुविधा मिळणार आहे. प्रवाशांच्या हक्काच्या सेवेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. बसफेरी पूर्ववत झाल्यानंतर तिचे नियमित संचालन आणिअधिकृत थांब्यांवर प्रवाशांना प्रत्यक्ष सेवा मिळते का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय-बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबध्द- मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये कोट्यावधींची उलाढाल..

vishwatmaklokswamivarta

गोर-गरीब राहत असलेल्या वस्त्यांमधील नागरी सुविधांसाठीमहानगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta

वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय स्कायवॉकच्या दोन्ही बाजूस सरकते जिने – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा