vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गोर-गरीब राहत असलेल्या वस्त्यांमधील नागरी सुविधांसाठीमहानगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

गोर-गरीब राहत असलेल्या वस्त्यांमधील नागरी सुविधांसाठीमहानगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

 

जालना,प्रतिनिधी)-जालना शहरातील गोर-गरीब राहत असलेल्या वस्त्यांमधील नागरी सुविधांसाठी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुखभास्कर अंबेकर यांनी सांगितले.

जालना शहरातील रेल्वेस्टेशन जवळील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेनगर यावस्तीत जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते गट्टू बसविण्याच्या कामाचा शुक्रवार १७ जानेवारी रोजी शुभारंभ करण्यात आला.यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, जालना शहरात ४० ते ५० झोपडपट्टया आहेत. त्यातून अनेक गोर-गरीब श्रमजीवी नागरीक वास्तव्य करतात. त्यांचा अगदीच जगण्याचा संघर्ष नियमित सुरू असतो.त्यांच्या वस्त्यांत अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कमीजागेमुळे सार्वजनिक शौचालये, शिक्षण अशा अनेक प्रश्नांचा ते दैनंदिन सामना करतात. प्रभावहीन असल्यामुळे प्रशासनाचे त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते.शहरातील इतर वस्त्यांबरोबरच सर्व झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा प्रशासनाने लक्ष देऊन त्यांचे नागरी प्रश्न सोडवावेत यासाठी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कररावअंबेकर यांनी सांगीतले. यावेळी मातंग समाजाचे नेते रविकांत जगधने, विनोद आठवे, गोविंद आठवे यांच्यासह अश्विन अंबेकर, गणेश तरासे, मदनराव खरात,परमेश्वर वाघमारे, बंडू आगळे, संजय अंभोरे, आदींची यावेळी उपस्थिती होती.

०००००००००

फोटो ओळी.- जालना शहरातील रेल्वेस्टेशन जवळील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेनगर या,वस्तीत जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते गट्टू बसविण्याच्याकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिक.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील बीडच्या सरपंचाची खंडणी-हत्या: आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी….

vishwatmaklokswamivarta

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अहमदाबादमधील मेघानी नगर इथं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान अपघात.

आता लाडकी बहीण योजनेसाठी आधार प्रमाणीकरण…

vishwatmaklokswamivarta

बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेला राज्यशासनाच्यावतीने गती-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार