vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीत आटपाडी तालुक्यात १२२ शेतकऱ्यांना रस्ताप्रश्नी दिलासा

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीत आटपाडी तालुक्यात १२२ शेतकऱ्यांना रस्ताप्रश्नी दिलासा

सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात घेण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीत शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रलंबित प्रश्न आपापसात मिटवून ९ तडजोडीतून १२२ शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला.

या महसूल लोकअदालतीत एकूण ६२ रस्त्यांच्या प्रकरणे सुनावणी व तडजोडीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९ रस्ता प्रकरणामध्ये अर्जदार आणि जाबदार यांनी आपापसात सामंजस्याने तडजोडनामा सादर केला. यामुळे दिलेल्या तडजोडनाम्यामुळे ही प्रकरणे निकाली काढणे शक्य झाले असून, या ९ तडजोडींमुळे तालुक्यातील एकूण १२२ शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.

या लोक अदालतीस ३२० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले दावे मिटवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, आटपाडी तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी व संबंधित विधिज्ञांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच निवासी नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे, निवडणूक नायब तहसीलदार प्रकाश सगर आणि महसूल नायब तहसीलदार दत्तात्रय दीक्षित यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि समन्वयामुळे शेतकऱ्यांचे रस्ता प्रश्न सहजासहजी सुटण्यास मोठी मदत झाली.

०००००

संबंधित पोस्ट

इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले विजेत्यांचे कौतुक; इंडिया स्किल्सची आगामी स्पर्धा होणार मुंबईत

सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न**साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प**- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

निवडणूक प्रक्रियेतील माध्यमांसाठी जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींवर निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम..

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या ठिकाणी भारताच्या विजयासाठी ‘शतचंडी यज्ञ’ आरंभ