vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नव्या मुंबईत भाऊबीजेच्या गिफ्टचा ट्रेंड बदलतोय; सोने-चांदी, स्मार्ट फोन खरेदीला पसंती…

 नव्या मुंबईत भाऊबीजेच्या गिफ्टचा ट्रेंड बदलतोय; सोने-चांदी, स्मार्ट फोन खरेदीला पसंती….

मुंबई प्रतिनिधी  प्रत्येकाच्या आयुष्यात चैतन्य आणि भरभराट घेऊन येणाऱ्या दीपोत्‍सवात भाऊबीजेच्या दिवशी  घरोघरी ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया’ या अजरामर गीताच्या ओळी हमखास गुणगुणल्या जातात. या दिवशी मृत्‍यूचा देव आपल्या बहिणीच्या घरी गेला आणि त्याने आपली बहीण यमी हिला मौल्यवान अलंकार (precious ornaments) भेट दिले आणि तिच्या घरी भोजन केले, अशी आख्यायिका आहे. ही प्रथा आजही कायम असून भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या  घरी जाताना भाऊ भेट वस्तू घेऊन जातात.

तर बहिणीही लाडक्या बंधुराजासाठी सुग्रास जेवण तयार करून भेटवस्तू देते. शनिवारी (ता. ६) साजऱ्या होणाऱ्या भाऊबीजेकरिता भेटवस्तू खरेदीसाठी पनवेल परिसरातील बाजारपेठेमध्ये गुरुवारी तोबा गर्दी झाल्‍याचे चित्र पाहायला मिळाले. गतवर्षी कोरोनामुळे खरेदीवर निर्बंध आले होते. मात्र यंदा कोरोना रुग्‍णसंख्या आटोक्‍यात आहे.

प्रशासनाने निर्बंधात शिथिलता आणल्‍याने खरेदीला उधाण आले आहे. विविध प्रकारच्या भेटवस्तू विक्रेत्यांनी उपलब्ध असल्याने पनवेल शहरासहित ग्रामीण भागातील ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. भांडी, कपड्यांच्या भेटवस्तू खरेदीचा पूर्वी असलेला ट्रेंड बदलला असून आता महागड्या भेटवस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती पनवेलमधील व्यावसायिक चंदन शर्मा यांनी दिली आहे.सोने-चांदीच्या वस्तू खरेदीला प्राधान्यभविष्यात लहानशी गुंतवणूक आणि भेटवस्तू असा दुहेरी योग साधत ग्राहक सध्या सोन्या-चांदीच्या लहान वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स सामान खरेदीला प्राधान्य देत आहेत. चांदीचे चेन, ब्रेसलेट, अंगठी तर सोन्याची पेंडन्ट, अंगठ्या अशा पाच ते १५ हजारापर्यंत वस्तू खरेदीला पसंती मिळत असल्‍याची माहिती कळंबोलीमधील एका ज्वेलर्सचे मालक कमल कोठारी यांनी दिली.

 

संबंधित पोस्ट

क्रीडा महोत्सवात अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साही वातावरणात नोंदवला सहभाग-अधिकारी-कर्मचारी यांनी शारिरीक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवानिमित्त  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे; उद्या रेल्वे रोको आंदोलन

vishwatmaklokswamivarta

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

तूर खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही याची काळजी घेवून नियोजन करावे– पणन मंत्री जयकुमार रावल24 जानेवारीपासून राज्यात तूर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार..

vishwatmaklokswamivarta

3 जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन