नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ९ वी व ११ वी प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : जवाहर नवोदय विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता ९ वी व ११ वीच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘लॅटरल एन्ट्री सिलेक्शन टेस्ट-२०२७’साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० सप्टेंबर २०२६ होती
इयत्ता ९ वी व ११ वीची प्रवेश परीक्षा शनिवार, दि. १० एप्रिल २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.इयत्ता ९ वी प्रवेशासाठी पात्रता,विद्यार्थी संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असावा. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ८ वीमध्ये शिकत असावा. विद्यार्थ्याचा रहिवासी जिल्हा व इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या शाळेचा जिल्हा एकच असावा. विद्यार्थ्याची जन्मतारीख दि. १ मे २०१२ ते दि. ३१ जुलै २०१४ या कालावधीतील असावी. दोन्ही तारखांचा समावेश आहे,
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी पात्रता,विद्यार्थी संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असावा. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता १० वीमध्ये शिकत असावा. यापूर्वी इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र राहणार नाहीत. विद्यार्थ्याचा रहिवासी जिल्हा व इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या शाळेचा जिल्हा एकच असावा. विद्यार्थ्याची जन्मतारीख दि. १ जून २०१० ते दि. ३१ जुलै २०१२ या कालावधीतील असावी. दोन्ही तारखांचा समावेश आहे.
इयत्ता ९ वी प्रवेशासाठी “ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ” (https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9/?utm_source=chatgpt.com) तर इयत्ता ११ वी प्रवेशासाठी “ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ” (https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11 /?utm_source=chatgpt.com) येथे अर्ज करता येईल.
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शासकीय व मान्यताप्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.