vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नगर पंचायत कोरेगाव आणि तालुका कार्यालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

नगर पंचायत कोरेगाव आणि तालुका कार्यालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सातारा प्रतिनिधी नगर पंचायत कोरेगाव, आरोग्य विभाग आणि तालुका कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे नागरिकांची रक्तदाब , मधुमेह, नेत्र तपासणी, ईसीजी तसेच सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजूंना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.

 या कार्यक्रमास नगर पंचायतीचे पदाधिकारी, तालुका कार्यालयातील अधिकारी, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग व नगर पंचायत प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.

0000

 

संबंधित पोस्ट

खडकी येथे आरोग्य विभागाचा ‘सेवा संकल्प’; विविध आरोग्य सर्वेक्षणांसह प्रतिबंधात्मक उपाययोजना किटकशास्त्रीय व साथरोग सर्वेक्षण; कुष्ठरुग्ण तपासणीसह पाणी शुद्धीकरणाबाबत जनजागृती

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवाच्या मंचावरून ‘लोकसंवाद-२०२६’; नांदुरा येथे आरोग्य विषयक जनजागृती

vishwatmaklokswamivarta

मिरज शासकीय रुग्णालयातील हिमोडायलिसिस सेवा ठरतेय हजारो रुग्णांसाठी जीवनदायी/आधार- चार वर्षांत १३,०७७ रुग्णांवर उपचार;  एचआयव्ही बाधितांसाठी स्वतंत्र यंत्राची सुविधा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांना बळी पडू नका-डॉ. अमोल गीते यांचे आवाहन

शहापूर तालुक्यातील वाशाळा येथे १०३ गरोदर मातांना मोफत सुकामेवा वाटप प्रतीक्षा झावर फाउंडेशन आणि ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचा कुपोषण निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम.