vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाबळेश्वर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कायदेविषयक व योजनांची जनजागृती

महाबळेश्वर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कायदेविषयक व योजनांची जनजागृती

सातारा प्रतिनिधी: जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अभय केंद्र व संरक्षण अधिकारी कार्यालय, तालुका महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ५ ऑक्टोबर रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वर येथील गिरिस्थान नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक ३ येथे हा कार्यक्रम पार पडला

या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, बाल संरक्षण समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांना महिला व बाल संरक्षणाशी संबंधित विविध कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

यावेळी उपस्थितांना कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ आणि हुंडा प्रतिबंध कायदा (२० जून १९६१) या महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच बालकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या बाल संरक्षण कायद्यांविषयी उपस्थितांना जागृत करण्यात आले.

तसेच, गरजू व अनाथ बालकांच्या संगोपनासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’ची माहिती देऊन नागरिकांनी व पालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.या उपक्रमामुळे शाळा प्रशासन, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये महिला व बाल हक्कांच्या संरक्षणाबाबत मोलाची जनजागृती झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

0000

संबंधित पोस्ट

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण करून १ मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शेंडा पार्कमध्ये सीपीआरसह शासकीय महाविद्यालय व विविध संस्थांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

जेईई मेन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी ..

vishwatmaklokswamivarta

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन