vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

 

रायगड – प्रतिनिधी: राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र “एकल महिला धोरण” तयार करीत असून, या धोरणाला अधिक व्यापक, लोकाभिमुख व परिणामकारक स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथील राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

 या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय स्वीकारण्यात येणार आहेत.

रोजगाराच्या संधी, मालमत्ता हक्क, अपत्यांचे शिक्षण, निवारा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील सुधारणा, नव्या योजनांविषयी अपेक्षा, कायदेशीर अडचणी व न्यायालयीन प्रक्रियेतील सुधारणा, महिलांची सुरक्षितता तसेच सामाजिक सहभाग वाढविण्यासंदर्भातील सूचना लिखित स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यशाळेदरम्यान प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करताना योग्य तो विचार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विषयतज्ज्ञ यांनी सक्रिय सहभाग घेऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी केले आले आहे.

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ;बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशिल – ना.प्रतापराव जाधव

अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित, शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमली चार सदस्यीय चौकशी समिती !

विधानभवन हाय अलर्टवर: खलिस्तान आतंकवादी यांच्या  धमकीच्या ईमेलनंतर परिसरात सुरक्षा कडक!

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७: स्वगणनेच्या टप्प्यास प्रारंभ प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्या- पालकमंत्री संजय शिरसाट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. याच निमित्ताने त्यांचे कार्य आणि विचारावर आधारित विशेष लेख !