ठाणे जिल्ह्यात 111 जागांसाठी कोतवाल भरती जाहीर 7 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
ठाणे, प्रतिनिधी: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२६ अन्वये जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील एकूण 111 रिक्त पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे.
शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 20 ऑगस्ट 2025 च्या पत्रानुसार या भरतीस विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून पात्र उमेदवारांना https://thane.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागणार आहे. जिल्ह्यातील विविध तहसिल कार्यालयांतर्गत पदांचे वितरण खालीलप्रमाणे आहे: • अंबरनाथ: २१ पदे (सर्व सर्वाधिक)• ठाणे: २४ पदे• कल्याण: १४ पदे • भिवंडी: १४ पदे (नॉन-पेसा: ११ | पेसा: ३)• मुरबाड: १९ पदे (नॉन-पेसा: ११ | पेसा ० ते २५%: ४ | पेसा २५% पेक्षा जास्त: ४) • शहापूर: १९ पदे (पेसा २५% पेक्षा जास्त: ११ | पेसा ० ते २५%: ८) या भरतीमध्ये अनुसूचित जाती (१३%), अनुसूचित जमाती (७%), विमुक्त जाती-अ (३%), भटक्या जमाती-ब (२.५%), भटक्या जमाती-क (३.५%), भटक्या जमाती-ड (२%), विशेष मागास प्रवर्ग (२%), इतर मागास वर्ग (१९%), सामाजिक आणि शैक्षणिक मागास (१०%), आर्थिक दुर्बल घटक (१०%) आणि अराखीव (खुला) प्रवर्ग (२८%) यानुसार सामाजिक आरक्षण लागू आहे. तसेच महिलांसाठी ३० टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. (टीप: परिस्थितीनुसार पदांच्या संख्येत आणि आरक्षणात बदल होऊ शकतो.)भरती प्रक्रियेचे महत्त्वाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे (२०२६):* ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: ७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)* परीक्षा शुल्क भरण्याची मुदत: २२ ऑक्टोबर (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)* अर्जांची छाननी: २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर* प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध कालावधी: ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर* प्रत्यक्ष परीक्षा दिनांक: रविवार, १५ नोव्हेंबर* उत्तरसूची व निकाल: १६ नोव्हेंबर* कागदपत्र पडताळणी: १७ ते २७ नोव्हेंबर*
नियुक्तीपत्र वाटप: २८ नोव्हेंबर उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://thane.kotwal.orgअधिकृत संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज व परीक्षा शुल्क भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.