vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

एआयच्या प्रभावी वापरातून कामकाजात सुलभता आणि गतिमानता – व्याख्याते श्री.विवेक मेहेत्रे

एआयच्या प्रभावी वापरातून कामकाजात सुलभता आणि गतिमानता – व्याख्याते श्री.विवेक मेहेत्रे

 

          नवी मुंबई प्रतिनिधी-  प्रशासकीय कामकाज करताना मराठीचा मान राखत, तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण नागरिकांना अधिक जलद आणि पारदर्शक सेवा पुरवू शकतो. याकामी कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थात एआयचा वापर या कामाला प्रचंड गतिमानता प्राप्त करून देतो त्यामुळे एआयचा स्मार्ट वापर प्रत्येकाने आपल्या कामकाजात हुशारीने केला पाहीजे व एआयशी मैत्री केली पाहीजे अशा शब्दात सुप्रसिध्द लेखक – व्याख्याते श्री.विवेक मेहेत्रे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

            नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित उपक्रमांमधील ‘कार्यालयीन कामकाजात मराठीतून कृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थात एआयचा वापर’ या विषयावर श्री.विवेक मेहेत्रे बोलत होते. मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव यांच्या हस्ते त्यांचे महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. उपआयुक्त श्री.संजय शिंदे व श्री.प्रकाश कांबळे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.

            1956 मध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता हा शब्द उदयास आला असा इतिहास सांगत त्यांनी एआयमधील अद्ययावत सुधारणांचा प्रवास कथन केला. एआयमुळे तुमची खुर्ची हिरावली जाऊ शकते ही भीती अनाठायी असल्याचे सांगत याउलट एआयच्या कामकाजातील योग्य वापराने तुमच्या कामाला माहितीपूर्ण स्वरूप येते व काम सोपे आणि जलद होतेअसा लाभ विवेक मेहेत्रे यांनी कथन केला.

            जगात 3 हजाराहून अधिक भाषा असून मराठी 16 व्या क्रमांकावर आहे. एआयला मराठीतून प्रॉम्प्ट दिल्यानंतर तो मराठी भाषेत कार्यवाही करतो, हे जागतिक स्तरावरही मराठी महत्वाची भाषा असल्याचे द्योतक असल्याचे सांगत त्यांनी याचा आपण सार्थ अभिमान बाळगला पाहीजे असे सांगितले.

            आपल्या व्याख्यानात त्यांनी विविध उदाहरणे देत, एआयचा कामकाजात प्रत्यक्ष वापर कसा करायचा याची प्रात्यक्षिके दाखवित. एआयच्या विविध माध्यमांची माहिती देत काळाची पावले ओळखून आपण ‘ई-लिटरेट’ व्हायला पाहीजे असे सांगितले. यावेळी नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणे नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.      पद्मश्री नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली   सुप्रसिध्द अभिनेते आणि शेतक-यांच्या, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर यांचे पहाटे 5.20 च्या दरम्यान दु:खद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना या कार्यक्रमाप्रसंगी स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

   9 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धा      अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त शुक्रवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी, ‘अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम संपन्न होणार आहे. यामध्ये अभिजात मराठी भाषेतील नामवंत कवींच्या आपल्याला आवडलेल्या एका कवितेचे पाच मिनीटे कालावधीत सादरीकरण केले जाणार आहे. सकाळी 10.30 वा. सुरू होणा-या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायं. 4.00 वा. होणार आहे. या स्पर्धेत 60 हून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी तसेच नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला असून प्रवेश विनामूल्य आहे. यामधील विजेत्यांना ग्रंथभेट स्वरूपात आकर्षक पारितोषिके प्रदान केली जाणार असून यानिमित्त अभिजात मराठी कवितेतील वैविध्य अनुभवण्यासाठी रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

पुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी -प्रकल्प संचालक शालिनी कडू

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे लाभार्थ्यांना मिळणार’डिजिटल मार्केटिंग’, ‘ई-कॉमर्स’ची साथ

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज; डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर – पणन मंत्री जयकुमार रावल

गोवा विमानतळावर परीक्षा गैरव्यवहारासाठी वापरली जाणारी ब्लूटूथ साधने बाळगलेल्या दोन विमान प्रवाशांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने घेतले ताब्यात जप्त केलेल्या उपकरणांचा संबंध भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा भरती परीक्षेशी असल्याचेही झाले उघड, या प्रकरणी गुन्हाही दाखल

vishwatmaklokswamivarta

ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची कसून पडताळणी करणे आवश्यककामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे आदेश ग्राहक सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा*कामगार आणि गृह विभागाची संयुक्त बैठक

टीईटीबाबत मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक विचार; शिक्षकांना एआयचे मोफत प्रशिक्षण