vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आडगाव सरक येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून दुष्काळी शेतीची पाहणी

आडगाव सरक येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून दुष्काळी शेतीची पाहणी…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव सरक येथे दुष्काळी शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या कपाशी, बाजरी व मका या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांकडून पिकांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.

आठवले यांनी शेतकरी काशिनाथ मोकळे यांच्या एक हेक्टर क्षेत्रातील पिकांची पाहणी केली. जून-जुलैमध्ये पेरणी केल्यानंतर बियाणे, औषधे व शेतीच्या मशागतीसाठी खर्च करूनही पावसाअभावी पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. कपाशीच्या पिकाला पूर्वी एका फांदीला २५ बोंडे लागत असत; मात्र यंदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्वी एकरी सुमारे १० क्विंटल उत्पादन मिळत असे. त्यातून सुमारे ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. यंदा मात्र एकरी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च होऊनही उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे शेतकरी काशिनाथ मोकळे यांनी सांगितले.

पावसाअभावी कपाशी, बाजरी, मका, तूर व इतर पिकांची अवस्था बिकट झाली आहे. शेतातील उभी पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आठवले यांनी शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, तहसीलदार शिवानंद बिडवे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

000000

संबंधित पोस्ट

डाक विभागाची सांगलीत 6 जुलैला पेंशन अदालत

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या कारवाईत डीआरआय तर्फे रेल्वे प्रवाशाकडून सुमारे 5.75 किलो क्रिस्टल मेथ जप्त ; एकाला अटक

vishwatmaklokswamivarta

एसआयआर अंतर्गत मतदार गणनाअर्ज दाखल करण्याची 17 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी

भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धतीबाबत 22 एप्रिल रोजी विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवावे – मंत्री आदिती तटकरे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा आढावा

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी पूर्वप्रशिक्षणाची संधी,पूर्वतयारीसाठी २५ एप्रिल रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन