vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

गरोदरपणात महिलांच्या एचआयव्ही चाचणीसोबत काविळ चाचणीही प्राधान्याने व्हावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड*

*गरोदरपणात महिलांच्या एचआयव्ही चाचणीसोबत काविळ चाचणीही प्राधान्याने व्हावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड*

कोल्हापूर  : प्रतिनिधी) एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये मिशन एड्स सुरक्षा अंतर्गत कोल्हापूर जिल्हा संघर्षशील वर्गातून सक्षम कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. याकरिता राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील सर्व घटकांचे योगदान लाभले असून राज्यातील सुरक्षित प्लस वर्गवारी गाठण्यासाठी प्रत्येक गरोदर महिलेची एच.आय. व्ही सिफिलिस व कावीळ तपासणी करणे अत्यावश्यक असून ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या तपासण्या करण्यात याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीमध्ये ते बोलत होते.

             ते म्हणाले , जिल्ह्यातील ट्रान्सजेंडरना मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड मिळण्यास येणारे अडथळे लवकरच दूर केले जातील. याबाबतची यादी प्रशासनाकडे देण्यात यावी तसेच आरोग्य विभागाकडून गुप्तरोग तपासण्यांवर भर दिला गेल्यामुळे गुप्तरोग संशयित येण्याचा आकडा वाढला आहे.अशा वेळेस निदान होण्याकरता तातडीने पुढील तपासण्या करणे गरजेचे आहे. त्या विनाविलंब सर्व रुग्णालयांमध्ये व्हाव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

      जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा देताना एड्स नियंत्रण कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा संघर्षशील वर्गामधून सक्षम वर्गामध्ये गेला असून सुरक्षित वर्गामध्ये जाण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.

             युवा दिन मॅरेथॉन स्पर्धेत मुले-मुलींच्या गटांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे स्पर्धक हे राज्यांमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले असून पटना (बिहार) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या स्पर्धकांची निवड झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनंदा गायकवाड यांनी दिली . यावेळी देश पातळीवर राबविल्या गेलेल्या रिस्क असेसमेंट अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री राठोड यांनी कोल्हापूर जिल्हा एड्स नियंत्रण

संबंधित पोस्ट

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य..जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार

चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न.

7 एप्रिल रोजी जिल्ह्यात ‘जागतिक आरोग्य दिन’ होणार साजरा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृतीवर भर

जागतिक हिवताप दिनी नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन  

जिल्हा आरोग्य विभागाकडून गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाला गतीNQAS अंतर्गत आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्यावर भर; ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन प्रमाणपत्र प्राप्त

नांदेड जिल्ह्यात १०६७ रुग्णांना सुमारे ०८.२१ कोटींची मदत ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती