vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्राहकांनी सतर्क राहून भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

ग्राहकांनी सतर्क राहून भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

 

सांगली, प्रतिनिधी- सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ग्राहकांनी सतर्क राहून, कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जात असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये दि. 1 सप्टेंबर 2026 ते 26 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अन्न व्यावसायीकांच्या एकूण 258 तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 290 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले असून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीच्या अनुषंगे 144 अन्न व्यावसायीकांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या असून 62 अन्न व्यावसायीकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 37 अन्न आस्थापनांमधून नमुने घेवून 1 कोटी 28 लाख 17 हजार 512 रुपये किंमतीचा अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ग्राहकांनी तयार अन्नपदार्थ जसे कि मिठाई व इतर दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करत असताना ते ताजे असल्याची खात्री करावी. तसेच मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर खावून संपवावेत किंवा रेफ्रिजरेटर मध्ये योग्य तापमानास साठवावेत. अन्नपदार्थ विक्रेत्यांनी सर्व अन्नपदार्थ चांगल्या व आरोग्यदायी वातावरणामध्ये बनवावेत व विक्री करावेत. शिळे अन्नपदार्थ विक्री केले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अन्न परवाना/नोंदणी घेतल्याशिवाय अन्न पदार्थाचा व्यवसाय करु नये. असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जालना शहरात पाम सण्डे निमित्त प्रभात फेरी उत्साहात संपन्न

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीला गती द्या – पालकमंत्री गिरीश महाजन कुंभमेळा प्राधिकरणातर्फे पूर्वतयारी आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि  वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन