vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारताचे लोहपुरुष आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात मधील एकता नगर, केवडिया येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ समारंभात पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी

भारताचे लोहपुरुष आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात मधील एकता नगर, केवडिया येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ समारंभात पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी

राज्य प्रतिनिधी

भारताचे लोहपुरुष आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात मधील एकता नगर, केवडिया येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ समारंभात पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.

देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधून प्रत्येकी ५० नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ गुजरात येथे आमंत्रित करण्यात आले आहे.

यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील ५० नागरिकांचा समावेश असून, प्रतिनिधी मंडळातील पहिल्या टप्प्यात दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, नक्षल सेल, गोंदिया यांच्यासोबत ३ नागरिकांना एकता नगर, गुजरात येथे पाठविण्यात आले. या नागरिकांचा २ दिवसांचा गुजरात दर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे.

त्यानंतर दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे आणि दीपक तरवडे यांच्या समवेत उर्वरित ४७ नागरिकांना गुजरात येथे रवाना करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया दिनेश शुक्ला यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रवासाला सुरुवात करण्यात आले.

 

#राष्ट्रीयएकतादिन

संबंधित पोस्ट

जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन

एसआयआर अंतर्गत मतदार गणनाअर्ज दाखल करण्याची 17 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

नवी मुंबईत बांधकाम स्थळांवरील डासउत्पत्ती स्थानांवर कार्यवाहीची विशेष मोहीम..

महिला सक्षमीकरणाची दीपशिखा : श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांची प्रेरणादायी कार्यगाथा

vishwatmaklokswamivarta

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद..