vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्टँडअप कॉमेडीयन मुनव्वर फारुकी ला ! मुंबईत आता मुंबई काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला आहे.

 स्टँडअप कॉमेडीयन मुनव्वर फारुकी ला ! मुंबईत आता मुंबई काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला आहे.

मुंबई प्रतिनिधी ;स्टँडअप कॉमेडीयन मुनव्वर फारुकीने आपले कार्यक्रम रद्द केल्यानंतर देशभरात त्याच्या नावाची मुद्दा चर्चा झाली होती. मुनव्वर फारुकीने निराश होत स्वत: याबद्दल माहिती दिल्यानंतर, व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता मुंबई काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला आहे.

 

गेल्या काही आठवड्यात फारुकीचे १२ हून अधिक शो रद्द करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर आता मुंबईत शनिवारी फारुकीचा शो पार पडला. हा शो ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसने आयोजित केला होता. गेल्या काही महिन्यांत मुनव्वर फारुकीचे शहरातील अनेक ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यामुळे दबावात आलेल्या फारुकीने कार्यक्रम न करण्याचे संकेतही दिले होते.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये फारुकीचा शो आयोजित करण्यात आला होता. AIPC ने कार्यक्रमाचे फोटो ट्विट करत, ‘आम्ही काल मुंबईत मुनव्वर फारुकीचा शो आयोजित केला होता. कलाकाराला सर्जनशील स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, जोपर्यंत तो संविधान आणि सर्व धर्मांच्या श्रद्धांचा आदर करतो. आपण एखाद्याच्या मताशी किंवा कंटेंटशी असहमत असू शकतो, परंतु आपली मतं लादण्यासाठी बळाचा वापर करणे घटनाबाह्य आहे’ अशा शब्दांत माहिती दिली.

दरम्यानस, फारुकीला उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून सतत धमक्या येत होत्या. त्यानंतर त्याने “द्वेष जिंकला आणि कलाकार हरला. माझे काम झाले, गुडबाय, हा अन्याय आहे” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

संबंधित पोस्ट

संजय राऊतांना जामीन मिळणार? पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज कोर्टात सुनावणी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी.

राज्यासह देशभरात मान्सूनला दमदार सुरूवात: पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कोकण आणि गोव्यासाठी विशेष रेल्वे गाडी…

vishwatmaklokswamivarta

लोकसभेत सुरक्षाविषयी घडलेल्या घटनेची उच्चस्तरिय चौकशी- अध्यक्ष ओम बिर्ला…

vishwatmaklokswamivarta