vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तेलाची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA)कारवाई सुरू केली असून ‘तेलाचा वारंवार वापर टाळा, आपले आरोग्य सांभाळा’, असे आवाहनही केले आहे.

तेलाची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA)कारवाई सुरू केली असून ‘तेलाचा वारंवार वापर टाळा, आपले आरोग्य सांभाळा’, असे आवाहनही केले आहे.

 

मुंबई : प्रतिनिधी;  तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अशा खाद्यतेलाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, अल्झायमर, यकृतरोग होण्याचा संभव असतो. अशा तेलाची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA)कारवाई सुरू केली असून ‘तेलाचा वारंवार वापर टाळा, आपले आरोग्य सांभाळा’, असे आवाहनही केले आहे.

स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम करण्याची किंवा तळण्यासाठी तेच तेल वापरण्याची प्रथा सामान्य आहे. मोठे खाद्य व्यावसायिक आपल्याकडे वापरलेल्या तेलाची विल्हेवाट लावतात; परंतु काही वेळा ते तेल स्वस्तात लहान खाद्यविक्रेत्यांना विकतात. तसेच रस्त्यावरही अनेक खाद्यपदार्थाचे ठेले लागतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर होतो. परंतु, अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या तेलाचा दर्जा बहुतांश वेळा तपासला जात नाही.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने एकूण तेल शुद्धीकरणासाठी असणारी टीपीसी मर्यादा २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी असे सांगितले आहे; मात्र वारंवार तेल तळल्यामुळे त्याचे गुणधर्म बदलतात ते टीसीपी मर्यादा ओलांडते. त्यामुळे असे तेल मानवी सेवनासाठी असुरक्षित असते, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले. त्यामुळे तेलाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी व दूषित तेलाच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यातील 8 मतदारसंघात एकूण 195 उमेदवारांची 249 नामनिर्देशन पत्रे दाखल अखेरच्या दिवशी 118 उमेदवारांची 126 नामनिर्देशन पत्रे दाखल

vishwatmaklokswamivarta

येत्या चार वर्षात मुंबईतील चित्रपट नगरीचा कायापालट करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ‘फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ मुलाखत प्रसंगी केले आश्वस्त· सायबर क्राईम विरोधात “डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन

देशात कुठेही घरबसल्या मिळणार सिमकार्ड, Aadhaar द्वारे सहजरित्या बदलू शकता कनेक्शन; नियमांत मोठा बदल

vishwatmaklokswamivarta

स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान- पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन,बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

vishwatmaklokswamivarta

मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे -मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रातील सूर..

vishwatmaklokswamivarta