vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र हादरला! वाळू माफियांकडून तहसीलदाराला जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न…

 महाराष्ट्र हादरला! वाळू माफियांकडून तहसीलदाराला जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न…

सोलापूर प्रतिनिधी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून अवैध वाळू वाहतूकवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराला वाळू माफियांकडून जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वेळीच तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने स्वतःच बचाव करून तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.

 

राहुल गायकवाड ( वय ४६, रा. केपी मार्केट वैजापूर ) असे या तहसीलदारांचे नाव आहे. तर याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

 

तहसीलदार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी ते १० मार्च रोजी रात्री आपल्या पथकासह गस्तीवर असताना लाखणी शिवारातील शिवना नदीपात्रातून अवैध वाळू चोरली जात असल्याची माहिती गायकवाड यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता शिवना नदीपात्रात त्यांना एका टिप्परमध्ये जेसीबीच्या साह्याने वाळू भरताना पाहायला मिळाली. पण पथक पोहचताच टिप्पर चालक पळून गेला. मात्र त्याचवेळी तेथे एक जेसीबी आढळून आला.

 

पथक जेसीबी ताब्यात घेण्यासाठी जात असतानाच तिथे मुळे नावाचा व्यक्ती आला आणि त्याने महसूल पथकाला जेसीबी ताब्यात घेण्यापासून रोखले. तर सोबत आणलेल्या एका व्यक्तीला थेट अंगावर जेसीबी घालण्याच्या सूचना दिल्या आणि तहसीलदार यांच्या दिशेने जेसीबीची सोंड जोरजोराने फिरवली. यावेळी जीव वाचवण्यासाठी पथक पळत असताना पुन्हा त्यांना जेसीबीची सोंडने चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र कसेबसे जीव वाचवून पथकाने पळ काढला.

राजकीय पाठबळ…

वाळूला सोन्याचं भाव मिळत असल्याने अवैध वाहतूक अधिक वाढली. त्यात शासकीय टेंडर कुणी घेत नसल्याने अवैध वाहुतक अधिक वाढली. तसेच राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने या लोकांची हिम्मत अधिक वाढली आहे. हप्ते देऊन अवैध वाहतूक करू द्या अन्यथा अशाप्रकारे हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वाळूमाफियांकडून सतत सुरू आहे.

संबंधित पोस्ट

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर…

राष्ट्रवादी पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड वादात केतकी चितळेची उडी, ठाणे पोलिसांना पत्र लिहत केली विशेष मागणी

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांना कृषी कायद्याप्रमाणेच माफी मागून तरुणांची आज्ञा पाळावी लागेल, राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दलाच्या चिनूक विमानांनी हिमाचल प्रदेशातील चंबा इथल्या मणिमहेश तीर्थक्षेत्रातून अडकलेल्या यात्रेकरूंना यशस्वीरित्या बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

कोरेगाव-भीमा शौर्य दिनाला परवानगी मग बैलगाडा शर्यतीला का नाही? – शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील…

देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में’ – मा. श्री. सुधीर मुनगंटीवार लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर झाल्‍या स्‍वाक्षरी ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta