
मणिपूरमध्ये भूस्खलन, आर्मी कॅम्प मातीच्या ढिगाऱ्याखाली…
मनिपुर दर्शिनी
अति पावसामुळे मणिपूरमध्ये भूस्खलन झाल्याची घटना समोर आली. या भूस्खलनाचे शिकार आर्मीचे जवान झाले आहे. या भूस्खलनमध्ये अनेक जवान फसले आहेत. या घटनेत लष्कराचा एक कॅम्प (Army Camp) मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याचे सांगितले जात आहे.
यात आतापर्यंत ७ जवानांचा मृत्यू झालाय तर जवळपास ४५-५० जवान आत दबले असल्याचे बोलले जात आहे.जवानांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर गंभीर जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याचेही सांगितले जात आहे.तुपुल रेल्वे स्थानकाजवळ ही भूस्खलनच्या घटनेची माहिती समोर आली आहे जिरीबामला इम्फाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार करण्यात येत होता,
ज्याच्या संरक्षणासाठी 107 टेरिटोरिल तुकडीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात पाऊत झाल्याने अचानक भूस्खलन झाले. दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) मणिपूरमधील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भूस्खलन घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे इजेई नदीलचा (EJE river) प्रवाह ही बाधित झाला आहे. या फटका नोनी जिल्हा मुख्यालयाच्या डोंगराखालील गावांना बसणार



