vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला

महाराष्ट्र राज्यात उध्दव ठाकरे यांच्या खास मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित….

 

मुंबई प्रतिनिधी

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.राज्यात सरकार स्थापन होवून आज जवळजवळ 24 दिवस झालेत पण सत्तासंघर्षासह प्रतिष्ठेची लढाई संपण्याचं काही चिन्ह नाही.

सत्ताधारी विरुध्द विरोधक नाही तर शिवसेना  विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्रात  रंगला आहे. कुठली शिवसेना खरी आणि कुठली शिवसेना खोटी ही प्रतिष्ठेची लढाई राज्यात बघायला मिळत आहे.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना प्रमुख कधीही माध्यमांपुढे येवून बोलले नाहीत पण सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाचं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाकडून संजय राऊत  यांना मुलाखत दिलेली आहे.

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची ही मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै अशा दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या मुलाखतीचा  टीझर नुकताच प्रदर्शित झाला असुन सामनाचे संपादक संजय राऊतांकडून हा त्यांच्या अधिकृत ट्विटरवर (Twitter) शेअर (Share) करण्यात आला आहे. मुलाखतीच्या टिझरमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे  शब्द प्रामुख्याने ऐकायला मिळत आहे. या टिझरमध्ये धनुष्यबाण कोणाचा? ठाकरेंना शिवसेना खरी का खोटी याचे पुरावे द्यावे लागत आहे असे संजय राऊत यांनी विचारले आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सामनामधील शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे तरी या मुलाखतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टिझरने मुलाखतीची उत्सुकता वाढवली आहे.

 

शिंदे सेना विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. तरी दोन्ही कडून रोजी आरोप प्रत्यारोपाची मालिका दोन्ही बाजूने बघायला मिळते. उध्दव ठाकरे सामनाला दिलेल्या मुलाखतीत काही गौप्यस्फोट करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तरी मुलाखत द्यायचीच होती तर ती इतर कुठल्या माध्यमाला, वृत्तपत्राला किंवा वृत्तवाहिनीला का नाही,सामनालाचं का? असा सवाल विचारत काही स्तरातून उध्दव ठाकरे यांना ट्रोलही केल्या जात आहे. तरी सामनाच्या या मुलाखतीची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे.

संबंधित पोस्ट

उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल प्रियांकाने वर्दीत असताना हातात रिव्हॉल्व्हर धरल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला., महिला कॉन्स्टेबलचा राजीनामा

vishwatmaklokswamivarta

कोकणात अतिवृष्टीचा इशारा, तर पुण्यात मुसळधार पाऊस, पहा हवामान विभागाचा अंदाज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

.उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…

vishwatmaklokswamivarta

अरबी समुद्रात मोसमी पाऊस दाखल; महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी पावसाची बरसात सुरू

राज्यातील अनेक जिल्ह्यात लाल परीची सेवा ठप्प; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप..

vishwatmaklokswamivarta