vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नोएडातील ट्वीन्स टॉवरप्रमाणे अनिल परबांचा साई रिसॉर्ट उद्ध्द्वस्त करावा, किरीट सोमय्यांची मागणी

नोएडातील ट्वीन्स टॉवरप्रमाणे अनिल परबांचा साई रिसॉर्ट उद्ध्द्वस्त करावा, किरीट सोमय्यांची मागणी…

 

महाराष्ट्र प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हातिल दापोलीतील साई रिसॉर्टचे कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात येणार असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली. नोएडामध्ये बांधलेले ट्वीन्स टॉवर्स काल पाडण्यात आले. त्याप्रमाणेच अनिल परबांचं ट्वीन्स रिसॉर्ट १२ सेकंदात उद्ध्द्वस्त केलं पाहिजे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली आहे.

 

माजी मंत्री अनिल परब यांचे रत्नागिरी येथे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट उभारण्यासाठी काळा पैसा वापरला गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे तर भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्यावर कारवाई झालेली नाही.

 

 

माजी मंत्री अनिल परब यांचे रत्नागिरी येथे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट उभारण्यासाठी काळा पैसा वापरला गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे तर भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्यावर कारवाई झालेली नाही. 24 ऑगस्ट रोजीच रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत हे रिसॉर्ट इतिहास जमा होणार असे ते ठणकावून सांगत आहेत.

रिसॉर्टप्रकरणी चौकशीही होणार ?

बेकायदेशीर असलेले रिसॉर्ट हे पाडले तर जाणारच आहे पण हे उभारण्यासाठी परबांकडे पैसे कोठून आले याची देखील चौकशी होणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित रिसॉर्टची चौकशी होण्याची मागणी सोमय्या हे करीत होते, पण अखेर आता दिवाळीपर्यत ते पाडले जाणार असल्याचा दावा ते करीत आहेत. शिवाय ते शनिवारी दापोलीला यात्रा काढणार आहेत. त्यावेळी याबद्दल मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर आपणही एक हातोडा हा दापोली ग्रामपंचायतीकडे देणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

एकीकडे शिवसेना पक्षाला घरघर लागली आहे तर दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकरणातही या पक्षातील नेत्यांची नावे समोर येत आहेत. खा. संजय राऊत हे पत्राचाळ जमिन घोटाळा प्रकरणी ईडीच्या ताब्यात आहेत तर आता नंबर कुणाचा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. असे असतानाच माजी मंत्री अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे संकेतच भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नसलेले सोमय्यां यांनी आता अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट हे इतिहासजमा होणार असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही केल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. सोमय्यांनी केलेला दावा हा अनिल परबांसाठी धक्का मानला जात आहे.

 

संबंधित पोस्ट

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते ३० रोजी ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ – मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी दादर येथे मूक निदर्शने..

vishwatmaklokswamivarta

लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी परिषद उपयुक्त ठरेल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

युक्रेन-रशिया युद्धामुळे पेट्रोलियमच्य किंमती वाढतच आहेत,. कमर्शियल LPG सिलेंडरचे भाव कडाडले; आता इतक्या रुपयांना मिळणार सिलेंडर…